जळगाव : रविवारी सुटीचा दिवस होता. यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी मेहरुण ट्रॅकवर सायकलिंगचा आनंद घेणाऱ्या अकरा वर्षीय बालकाला सुसाट कारने चिरडल्याची (Accident) घटना रविवारी (ता. २८) घडली. विक्रांत संतोष मिश्रा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. (Jalgaon Accident News)
जळगाव (Jalgaon) शहरातील एकनाथनगर येथे विक्रांत संतोष मिश्रा (वय ११) हा आई- वडीलांसह वास्तव्यास आहे. तो विद्या इंग्लिश मीडियम शाळेत चौथीचे शिक्षण घेत होता. रविवारी सुटीचा दिवस असल्याने विक्रांत व त्याचा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा हे दोघे सोबत सायकलिंगसाठी मेहरुण ट्रॅकवर गेले होते. मेहरुण ट्रॅकवर कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर चुलत भावासह सायकलिंग करत असताना ट्रॅकवर सुसाट वेगात येणाऱ्या दोन कारपैकी पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच १९ बीयु ६००६) विक्रांतच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघातात विक्रांत सायकलसह फुटबॉलसारखा हवेत उडाला व खाली डोक्यावर (Accident Death) कोसळला. तर, त्याची सायकल रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातानंतर परिसरातील तरुणांनी धाव घेत जखमीला जिल्हा रुग्णालयात (Hospital) हलवले. एमआयडीसी पोलिसांना (Police) घटना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
कुटुंबियांचा आक्रोश
गंभीर जखमी अवस्थेत विक्रांतला रुग्णालयात आणण्यात आले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्दा यांच्यासह डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर मृत घोषित केले. अपघाताची माहिती कळताच विक्रांतच्या कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनी रुग्णालयात धाव घेतली. विक्रांतचा मृत्यू झाल्याचे कळताच आई-वडील काकांसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. थोड्या वेळातच जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी उसळली.
पोलिस चौकीत पब्लिक मार
रुग्णालयात जमाव एकवटला असताना विक्रांत मिश्रा या मुलाला कारने चिरडणाऱ्या दोघांनाही रुग्णालयात आणण्यात आले होते. घटनास्थळावर हजर असलेल्या काही तरुणांनी त्यांना ओळखताच लोकांचा संताप अनावर झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयातील चौकीतच बदडून काढले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोघांना सुखरूप गर्दीतून काढून पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतले असून तिघेही अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असताना सुसाट कार रेसिंग करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.