जळगावच्या सबगव्हाण टोलनाक्यावर भीषण अपघात
गॅस टँकरने उभ्या टँकरला जोरदार धडक दिली
अपघातानंतर टँकरने पेट घेतला
चालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला
जळगावमध्ये भीषण अपघातामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पारोळा- धुळे राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण टोलनाक्याजवळ ही घटना घडली. एका गॅस टँकरने दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर गॅस टँकरने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. टोलनाक्यावर ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या आगीमध्ये टँकर पूर्णत: जळून खाक झाला. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील सबगव्हाण येथील टोलनाक्याजवळ उभे असलेल्या गॅस टँकरला धुळ्याकडून पारोळाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या गॅसने भरलेल्या टँकरने मागून जोरात धडक दिली. या अपघातानंतर टँकरला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून टँकर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सबगव्हाण टोलनाक्यावर टोल फाडण्यासाठी टँकर उभा होता. दरम्यान धुळेकडून पारोळाकडे वाहतूक करणारा गॅस टँकर भरधाव वेगाने येत होते. त्याच वेळी या टँकरचा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गॅस टँकरच्या पुढील भागाने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.
या आगीमध्ये टँकर चालक आणि क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. आगीत टँकरचा जळून खाक झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पारोळा पालिकेचे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. सहकाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आग तात्काळ विझविण्यासाठी धुळे अग्निशामक बंब बोलविण्यात आला. यावेळी आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला. या अपघातामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे व पारोळाकडील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर आग आटोक्यात आली.
या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन ते तीन तास ठप्प झाली होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला होता. या अपघाताची नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. हा अपघाताची घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.