Manoj jarange Patil Antarwali Sarati Latest News: Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil Z Plus Security: अंतरवालीमध्ये ड्रोनच्या घिरट्या! 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्या', सहकाऱ्यांची मागणी

Manoj jarange Patil Antarwali Sarati Latest News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे , जालना|ता. २ जुलै २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नजर ठेवली जात आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

अंतरवालीमध्ये ड्रोनच्या घिरट्या!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंतरवाली सराटीचे सरपंच आणि मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी पांडुरंग तारख यांच्या बंगल्यावर वास्तव्यास असताना काल रात्री ड्रोनने घिरट्या घातल्याचा दावा करण्यात आला आहे.

झेड प्लस सुरक्षेची मागणी

याबाबत सरपंच पांडुरंग तारख यांनी चिंता व्यक्त करत जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आज जालना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. आज रात्री घडलेल्या प्रकरणाबाबतही पोलिसांना माहिती दिली होती, ज्यानंतर गावात रात्रभर पोलिसांनी पहारा दिल्याचेही तारख यांनी सांगितले आहे.

कशी असते झेड प्लस सुरक्षा?

देशातील महत्वाच्या व्यक्तींना देण्यात येणारी झेड प्लस सुरक्षाही सर्वोत्तम सुरक्षा समजली जाते. १० पेक्षा जास्त एनएसजी कमांडो आणि ५५ हून अधिक प्रशिक्षित पोलीस कर्मचारी यामध्ये असतात. ज्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते,त्यांच्याभोवती अद्ययावत शस्त्रांसह २४ तास हे रक्षण कवच असते. या सुरक्षेचा खर्च महिन्याला जवळपास ४० ते ४५ लाख इतका येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात नेसण्यासाठी साडीचे ५ लेटेस्ट ट्रेंडिंग पॅटर्न; प्रत्येक महिलेला उठून दिसतील

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या ३ कारणांमुळे पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता रखडला, तुम्हीही ती चूक केलीय का?

५०० कोटींचा घोटाळा, ६० कोटी खात्यात वळवले; बड्या IAS अधिकाऱ्याला CBI कडून अटक, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT