मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी २० जानेवारीला मुंबईत येणारच अशी भूमिका घेतलेली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली होती. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे.
काय म्हणालेत जरांगे पाटील?
"अजित पवार (Ajit Pawar) यापुढे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात बोलले तर त्यांचा वेगळा विषय हाती घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा ग्रंथ लिहा, पण मराठा आरक्षणाबाबत बोलायचं नाही," असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला आहे. आज अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
लोकांचा वाढता पाठिंबा...
तसेच "पहिल्यापेक्षा या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढला आहे. जास्त दिवस झाल्यानंतर आंदोलनाची धार कमी होते, पण या दौऱ्यात लोकांचा पाठिंबा वाढलेला दिसून आला. असेही जरांगे पाटील (Manoj jarange Patil) म्हणालेत. मोर्चात आमच्या वाढलेल्या संख्येमुळे सर्वांना आरक्षण मिळणार आहे," असेही त्यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ओबीसी नेत्यांवर टीका..
दरम्यान, "अंतरवालीपासून मोर्चात मराठा बांधवांची संख्या कमी असेल पण पुण्यापासून वाढेल. प्रशासन मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांचा आकडा काढत आहे, पण त्यांचाही आकडा चुकेल असा दावाही त्यांनी केला. आमच्या मुंबई मोर्चाला ओबीसी समाज नाही तर ओबीसी नेते आडवे येत आहे," असे म्हणत ही त्यांची जुनीच सवय असल्याचा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.