School Closed News: थंडीमुळे अनेक राज्यांत हिवाळी सुट्ट्या वाढल्या, 'या' तारखेपर्यंत राहणार शाळा बंद

Winter Break Extended : थंडीमुळे अनेक राज्यांनी हिवाळ्याच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, नोएडा, लखनौ, पंजाब आणि इतर शहरांनी ऑनलाइन वर्ग किंवा हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
School Closed News
School Closed NewsSaam Tv
Published On

Winter Break Extended

थंडीमुळे अनेक राज्यांनी हिवाळ्याच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशातील नोएडा, लखनौ, पंजाब आणि इतर शहरांनी ऑनलाइन वर्ग किंवा हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. (latest marathi news)

देशभरातील थंड हवामानामुळं तापमानात सतत घट होतेय. त्यामुळं अनेक राज्यांनी हिवाळ्याच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशातील नोएडा, लखनौ, पंजाब आणि इतर शहरांनी ऑनलाइन वर्ग किंवा हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. कावेरी डेल्टा आणि उत्तर किनारपट्टीच्या प्रदेशांसह तामिळनाडूमध्ये कापणीसाठी आलेल्या पिकांचं रात्रभर झालेल्या पावसामुळं नुकसान झालंय.

थंडीमुळे शाळा बंद करणाऱ्या राज्यांची- शहरांची यादी

दिल्लीतील प्राथमिक शाळा म्हणजेच इयत्ता ५ वी पर्यंतच्या शाळा या आठवड्यात बंद राहतील. ८ जानेवारी रोजी सहावीच्या वर्गासाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, शाळांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ५ नंतर सुरू न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.चंदीगडमध्ये १३ जानेवारीपर्यंत ८ वी पर्यंत ऑनलाईन वर्ग घेण्यात येणार आहेत.

गौतम बुद्ध नगर प्रशासनानं नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील सर्व शाळांना इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १४ जानेवारीपर्यंत सुट्टीचे आदेश दिले आहेत. थंडीची लाट आणि दाट धुकं पाहून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. लखनौमध्ये ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या १० जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार आहे. इयत्ता ९वी ते १२वीच्या वर्गांना सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळा असल्याचं जिल्हा प्रशासनानं जाहीर केलंय. राजस्थान सरकारने प्राथमिक वर्गांसाठी १३ जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्टी जाहीर केलीय. मिळालेल्या माहितीनुसार हा आदेश खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही शाळांना लागू आहे.

School Closed News
Winter News Railway Track Shrinking: राजस्थानमध्ये थंडीचा कहर; चुरूमध्ये रेल्वेरुळही आकुंचन पावले, २ इंचाचा आला गॅप

पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

पुढील तीन दिवस दाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे. IMD ने पंजाबच्या काही भागांमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पुढील तीन दिवस दाट धुके पडण्याची शक्यता आहे. शिवाय, आज दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडीची शक्यता आहे. तर राजस्थानमध्येही आज संपूर्ण दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये १२ आणि १३ जानेवारी रोजी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये आज आणि उद्या दाट धुके असेल. तर ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये उद्यापासून पुढील २ दिवसांपर्यंत दाट धुके राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

School Closed News
Unseasonal Rain Hits Buldhana: वीज काेसळून शेगाव, खामगाव तालुक्यातील ३० मेंढ्यांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com