Sugarcane Workers: ऊसतोड कामगारांच्या मुलांचं भवितव्य अंधारात; अद्यापही साखर शाळा बंदच

Sugar School News: राज्यातील अनेक जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी मजूर स्थलांतर करत असतात. त्यांच्यासोबत मुलाबाळांसह संपूर्ण कुटुंब असते. गावाकडे कोणी नसल्याने ऊस तोडणीच्या ठिकाणी
Sugarcane Workers
Sugarcane WorkersSaam TV
Published On

सागर निकवाडे

Sugarcane News:

राज्यभरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झालाय. सध्या मोठ्याप्रमाणात ऊस तोडणी मजूर आपल्या मुलाबाळांसह ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या मुलांसाठी असलेल्या साखर शाळा अजून सुरू झाल्या नसल्याने ऊस तोड कामगारांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Sugarcane Workers
Sugar Factories: दोन माजी सहकारमंत्र्यांसह मातब्बर नेत्यांच्या कारखान्यांना साखर सहसंचालकांनी बजावली नोटीस; जाणून घ्या कारण

राज्यातील अनेक जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी मजूर स्थलांतर करत असतात. त्यांच्यासोबत मुलाबाळांसह संपूर्ण कुटुंब असते. गावाकडे कोणी नसल्याने ऊस तोडणीच्या ठिकाणी मुलाबाळांना घेऊन ते राहत असतात. गावाकडून आल्यानंतर जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरू केल्या जातात.

Sugarcane Workers
Ambarnath Crime News : आलिशान गाडी, काचेवर विधीमंडळाचं स्टिकर; तोतया महिला आमदाराला अंबरनाथमध्ये अटक

मात्र अजूनही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरू झाल्या नसल्याचे वास्तव समोर आलेय. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही मोलमजुरी करून जीवन जगत असलो तरी सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी अशी कैफियत ऊसतोड कामगार मांडताना दिसत आहेत.

आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट केले. गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने मुलांना सोबत घेऊन यावे लागते. आम्ही ज्या कारखाना परिसरात राहतो त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची गरज आहे. एकीकडे सरकार शिकाल तर टिकाल अशा घोषणा करत आहे आणि दुसीकडे उसतोड कामगारांच्या मुलांसाठी अद्याप साखर शाळा सुरू झालेली नाही.

Sugarcane Workers
Kalyan Crime: बापानं मुंबईत आणलं, पाणीपुरीची गाडी टाकली, पण पोरगा सुधारलाच नाही; मंदिरातील चोरीमुळं खरा चेहरा आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com