Jalana News Saamtv
महाराष्ट्र

Jalana News: आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा... बंजारा समाजाची मागणी; जालना- परभणी महामार्गावर 'रास्ता रोको'

Jalana Latest News: आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरला आहे. आज जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाकडून भव्य रास्ता रोको करण्यात आला.

लक्ष्मण सोळुंके

Jalana News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- बांधवांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरला आहे. आज (गुरूवार, २८ डिसेंबर) जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाकडून भव्य रास्ता रोको करण्यात आला.

विमुक्त जाती अ या प्रवर्गात मागच्या अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी केली आहे. त्यामुळं बंजारा समाजातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात मोठे नुकसान होत असल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात येत आहे.

याविरोधात गोर सेनेच्या वतीने जालन्यातील (Jalana) वाटूर येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी जालना परभणी महामार्ग (Jalana- Parabhani Highway) रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विमुक्त जाती अ मध्ये घुसखोरी करून खोटे प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करून त्यासाठी विशेष तपासणी पथकाची स्थापना करावी आणि बोगस प्रमाणपत्र रद्द करावे.. या मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT