Wheat Crop : जालना जिल्ह्यात यंदा गव्हाचा पेरा घटला; केवळ १३ हजार हेक्टरवर पेरणी

Jalna News : जालना जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे. तर रब्बी हंगामालाही पाणी नसल्यामुळं शेतकरी चिंतेत
Wheat Crop
Wheat CropSaam tv
Published On

जालना : जालना जिल्ह्यात यंदा गव्हाच्या पेऱ्यात मोठी घट झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर (Rabi Crop) रबीच्या हंगामात उत्पन्न घेण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाचा पेरा घातल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Jalna) जिल्ह्यात यंदा केवळ १३ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. (Maharashtra News)

Wheat Crop
Bus Accident : बसचे ब्रेक फेल होऊन कोंडाईबारी घाटात अपघात; सात प्रवासी जखमी

जालना जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला नसल्याने त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाल्याने हा हंगाम वाया गेला आहे. तर रब्बी हंगामालाही पाणी नसल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस (Rain) झाल्याने अनेक भागात पिकांना त्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ही झाले होते. यानंतर रब्बीच्या रखडलेल्या पेरण्यांना वेगही आला होता. त्यानुसार पेरणी झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wheat Crop
Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना आमंत्रण का नाही दिले; गिरीश महाजनांनी कारण सांगत साधला संजय राऊतांवर निशाणा

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ९८० हेक्टरवर पेरण्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात गव्हाचा पेरा घटला असून ४८ हजार हेक्टरपैकी केवळ १३ हजार ७४९ हेक्टरवर पेरणी झाली. त्यामुळं यंदा गव्हाच्या किमती वाढणार असून चपाती महाग होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com