ओबीसी आरक्षणासाठी साताऱ्यात रासपच्या वतीने जेलभरो आंदोलन  SaamTv
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी साताऱ्यात रासपच्या वतीने जेलभरो आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओंकार कदम

सातारा - सध्या राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणावरून मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. ओबीसी आंदोलनाच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आंदोलने केली आहेत व अद्यापही सुरूच आहेत. Jail-wide agitation on behalf of RSP in Satara for OBC reservation

हे देखील पहा -

माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या रासपने देखील आता या आंदोलनात उडी घेतली आहे. राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने साताऱ्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये आंदोलक एकत्र जमले होते. त्यानंतर आंदोलकांनी काही वेळ रस्ता रोको देखील केला. या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

यावेळी आंदोलकांच्या भावना तीव्र दिसल्या. राज्यामध्ये असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी रासपने केला. रासपच्या वतीने राज्याच्या विविध भागांमध्ये विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहेत. आज साताऱ्यात सुद्धा जेलभरो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :

१)राज्य सरकारने ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी.

२)ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा तातडीने भरून न्यायालयात जमा करावा.

3)ओबीसी आरक्षणाची स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदीर आहे की, वाघाचं पिल्लू...? एवढा भयंकर प्राणी तुम्ही कधी पाहिलात का?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे लढणार की नडणार? काय असेल विधानसभेसाठी रणनीती? पाहा व्हिडिओ

Maharashtra Assembly Election 2024 : तिसरी आघाडी, काम बिघाडी; विधानसभा निवडणुकीत कोणाची मते खाणार? पाहा व्हिडिओ

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

VIP Security: राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या VIP सुरक्षेतून नसणार NSG कमांडो, कोण करणार नेत्यांची सुरक्षा?

SCROLL FOR NEXT