...तर महाराष्ट्र तुम्हांला माफ करणार नाही; युवा वर्ग चवताळलाय

Swapnil Lonkar
Swapnil Lonkar
Published On

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील सुनील लोणकर (Swapnil Lonkar) याच्यावर सरकारचा भाेंगळ कारभार जबाबदार आहे अशी भावना युवा वर्ग व्यक्त करु लागली आहे. स्वप्नील यांनी त्याच्या सारख्या एमपीएसची केलेल्या आणि करु इच्छिणा-या शेकडाे युवकांना न्याय द्यावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (satara-youth-demands-justice-for-mpsc-swapnil-lonkar-marathi-news)

दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावा, गुणवंतांची आॅनलाईन मुलाखत घेऊन प्रश्न मार्गी लावावा, नाेकरी भरती करावी, युवा वर्गाने संयम बाळगावा अशी संमिश्र प्रतिक्रिया राज्यातील गावागावातून उमटू लागल्या आहेत.

Swapnil Lonkar
#MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या | या आत्महत्येला जबाबदार कोण?

याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही

MPSC चा अभ्यास करणारी मुलं रिकामटेकडे म्हणून पुस्तकं घेऊन बसलेली नसतात. भविष्यातले होणारे देशाचे प्रशासक असतात. एखादा पेपर सोडवला आणि पोस्ट मिळाली म्हणजे MPSC नसते. त्यासाठी अनेक शानशौकींना त्यांनी मुरड घातलेली असते. रात्रीचा दिवस करुन केलेले असते. MPSC ची परिक्षा पास होऊन अधिकारी म्हणून पदभार स्विकारेपर्यंतचा पल्ला खूप मोठा- लांबलचक असतो. पूर्व व मुख्य परिक्षा पास होऊन ३-३ वर्षे मुलाखत होत नसेल, नोक-या मिळत नसतील, तर पोरं जीव देतील नायतर काय ? सरकारला फक्त स्वत:च्या खुर्च्या शाबूत ठेवणे आणि खिसे भरणे हेच महत्वाचं वाटत आहे असं दिसतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या पोरांची भविष्य सेट करून ठेवलीत, पण आम्हां गोरगरिबांच्या पोरांनी करायचं काय? ना शिक्षणात, ना नाेक-यांत आरक्षण, काही विभागात तर जागा नाहीत, नाेकर भरती निघत नाहीत, तुमच्या नाकर्तेपणापायी आम्ही पोरांनी जीव द्यायचे का? आज स्वप्निल लोणकर या MPSC पास झालेल्या आमच्या सहका-याने नेमणुक आणि नोकरी अभावी जीव दिला, याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. हे सरकार ना शेतक-याचे, ना कष्टक-यांचे, ना आमच्या सारख्या विद्यार्थांचं. या घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि त्यातल्या सर्वच भ्रष्ट नेते, मंत्री यांचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो अशा शब्दांत युवती राजे प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्ष प्रिया साबळे हिने नमूद केले.

Swapnil Lonkar
मिताली राज ने नोंदवला नवा विश्वविक्रम

पात्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती घ्या

स्वप्नीलने आत्महत्या करण्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. कोरेाना संसर्गामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री ऑनलाइन बैठका घेत आहेत. याशिवाय ऑनलाईन कार्यप्रणालीलाच प्राधान्य देत आहेत असे असताना राज्य सेवेच्या पूर्व आणि मुख्य परिक्षा पास झालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती देखील ऑनलाईन घ्यायला हरकत नाही. त्यामुळे स्वप्नील सारख्या हुशार विद्यार्थ्याचा जीव निश्चीत वाचला असता. राज्यसेवा पात्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती, त्यानंतर त्यांची नियुक्ती याबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. जेणेकरून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होणार नाही असे प्रा. रामचंद्र साळुंखे (संस्थापक, गुरूकूल स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र,वडूज,ता.खटाव) यांनी नमूद केले.

Swapnil Lonkar
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ; नद्याजोड प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता

एमपीएससी परिक्षा देणारा मलवडी (जि. सातारा) येथील ऋषभ मगर म्हणाला गेली 2 वर्ष झाले. सुमारे 250 क्लास वन पदांसाठी परिक्षा झाली. सर्व साेपास्कर पार पाडूनही यशस्वीतांना नाेकरी मिळत नाही. त्यामुळे ती खचून जात आहे. आता 2021 आले तरीच जे गुणवंत हाेते त्यांना अजून नाेकरी नाही तर पुढच्या पिढीचे कसे हाेणार. सन 2019 च्य़ा अखेरीस एमपीएससीची जाहिरात आली. त्याची अजूनही परिक्षा झालेली नाही. त्यामुळे मध्यंतरी पुण्यात आंदाेलन झाले. त्यावर फक्त एक पेपर झाला. त्यानंतर पुन्हा काहीच हालचाल झाली नाही. युवा पिढीचे एकच म्हणणे आहे सरकारने ठाेस भुमिका घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील युवकांना तर महानगरांमध्ये राहायला आता आर्थिकदृष्या परवडत नाहीये. त्यामुळे ती मुलं गावाला येतात. पडेल ते काम करताहेत. गुणवत्ता असूनही मुलांना उत्तम व्यासपीठ मिळत नाहीये. व्यवसाय करावा तर लाॅकडाउन झालेला आहे. पाच पाच वर्ष काहीच हातात लागत नसल्याने समाजातील काही अपप्रवृत्ती टाेमणे एेकावयास लागतात ते वेगळेच.

Swapnil Lonkar
MPSC: संर्सगजन्य आजाराला विद्यार्थी बळी का पडतात?

बोगस कारभाराचे सरकारला गंभीर परिणा भोगावे लागतील

स्वप्निल यांनी नेमणुकीपासून तथा नोकरीपासून वंचित राहिल्याने केलेली आत्महत्या मनाला चटका लावून जाणारी अत्यंत दुःखद अशी घटना आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील तरूण तसेच विद्यार्थी आज असे पाऊलं उचलताहेत. हे वाईट आहे. शिक्षणात आणि नाेक-यांत कोणत्याही प्रकारचं आरक्षण, सूट-सवलती नसतांना, कष्ट करून, रात्रंदिवस अभ्यास करून तरूण युवक-युवती, विद्यार्थी इथपर्यंत पोचतात आणि शासनाच्या भाेगळ कारभाराचे, बळी पडतायत. देशात तथा राज्यात आलेलं हे महामारीचं सावट असो किंवा शेतकरी-कष्टकरी,व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे असो, राज्यातल्या हर एक घटकाला सरकारच्या ह्या नतध्रष्ट कारभाराला तोंड द्यावं लागत आहे. राज्यातलं हे तिघाडी सरकार कुणाचंच नाहीये हे गेल्या काही दिवसामधून स्पष्ट झालेलंच आहे. परस्पर तिन्ही पक्षांमध्ये कलह धुपत ठेऊन, स्वताच्या खुर्च्या शाबूत ठेवणं आणि जनतेच्या सुख-दुखाचंं काही दायित्व नसल्यासारखे स्वतःचेच खिसे भरत राहणे यातून ह्या तिघाडी सरकारला दुसरं काहीच दिसत नाहीये हेही उभा महाराष्ट्र बघतो आहे.

आमदार, खासदार तथा मंत्र्यांच्या मुलांना त्यांचे पारंपारिक व्यवसाय (आमदारकी,खासदारकी,अन् मंत्रिपदे) पिढीजात मिळत राहतात परंतु राज्यातील गोरगरिबांच्या होतकरू पोरांनी गुणवत्ता असूनही नाेक-यांअभावी असे जीव कधीपर्यंत द्यायचे? यांच उत्तर सरकारने द्यावं. घडलेल्या ह्या आत्महत्येस फक्त अन् फक्त हे सरकार जबाबदार आहे. हा बोगस कारभार असाच चालू राहिला तर सरकारला याचे गंभीर परिणामदेखील भोगावे लागतील अशा तीव्र शब्दांत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे यांनी भावना व्यक्त केली आहे.

Swapnil Lonkar
साताऱ्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी

बुध्दीमान विद्यार्थ्यांसारखी संपत्ती जपा

वडूजच्या हुतात्मा परशुराम विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मिलींदकुमार घार्गे म्हणाले लोणकर याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. राज्यसेवा आयोगाने कोणत्याही स्पर्धा परिक्षांच्या बाबतीत अगोदर परिक्षा, मुलाखती, पात्र विद्यार्थ्यांची नियुक्ती याबाबत कालबध्द कार्यक्रम निश्चीत करावा. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत धडपडत असतात. माजी राष्ट्रपती (कै.) अब्दुल कलाम यांचे एक वाक्य आहे, बुध्दीमान विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रसेवेसाठी बुध्दीमान विद्यार्थ्यांसारखी संपत्ती जतन करणे गरजेचे आहे.

Swapnil Lonkar
#MpscSwapnilLonkar सरकारनी आमच्या भावाचा खून केला

कर्ता मुलगा गेल्यानंतर कुटुंबाने काेणाकडे पाहायचे

अनेकांनी परिक्षा देऊनही त्यांना दाेन वर्ष झाली नाेकरी मिळत नाही, हे दुर्देव आहे. वयाेमर्यादा वाढली तर आपल्याला नाेकरी मिळणार नाही अशी भिती त्यांच्यात निर्माण हाेत आहे. त्यामुळेच ते निराश हाेत आहेत. खरंतर प्रशासकीय यंत्रणेत खूप जागा रिक्त आहेत. परंतु भरती हाेत नसल्याने युवा पिढी हतबल झाली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकाली लागावा. कर्ता मुलगा गेल्यानंतर त्या कुटुंबाने काेणाकडे पाहायचे. सरकराने लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा अशी भावना अभाविपचे सातारा जिल्हा संघटन मंत्री आेंकार मगदूम यांनी व्यक्त केली आहे.

Swapnil Lonkar
‘जिल्हाधिकारी साहेब, दाेन दिवस संपुर्ण जिल्हाच बंद ठेवा'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com