‘जिल्हाधिकारी साहेब, दाेन दिवस संपुर्ण जिल्हाच बंद ठेवा'

lockdown news
lockdown news
Published On
Summary

कोरोनाचे नियम पाळून या गरिबांना माल विक्रीला परवानगी दिली नाही तर हे लोक मोडून पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 3) केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवून अन्य आस्थापना बंद ठेवल्याने हातावरचे पाेट असणारे (पथारेवाले) आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या निर्णयावरुन नाराजी व्यक्त करु लागले आहेत. पथारीवाल्यांच्यावतीने हॉकर्स संघटनेचे प्रमुख संजय पवार यांनी केबिनमध्ये बसून निर्णय घेणा-यांनाे जरा बाजारात फिरा. केवळ हातगाडी, कपडे दुकाने बंद ठेवून काही हाेणार नाही करायचे आहे तर सर्वच गाेष्टी 2 दिवस बंद ठेवा अशी मागणीही त्यांनी केली आहे. (satara-hawkers-association-demands-to-open-shops-unlock-city)

साता-यातील काेविड 19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात पुन्हा केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडी ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे साेमवारपासून (ता. 5) निर्बंध आणखी कडक हाेणार आहेत. काही गोष्टींवर निर्बंध घालत असताना जीवनावश्यक नसलेल्या गोष्टींना परवानगी कशा काय दिली जाते असा प्रश्न हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

lockdown news
#MpscSwapnilLonkar सरकारनी आमच्या भावाचा खून केला

हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष संजय पवार म्हणतात ‘जिल्हाधिकारी साहेब जरा बाजारात फिरा... सकाळच्या वेळेत मंडईच्या बाहेर किती लोक रस्त्यावर असतात पाहा. हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देता अन्‌ कपड्याची दुकाने बंद ठेवता, असा उरफाटा न्याय का करताय.. कुणाचं तरी ऐकून गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका,’. तुम्हांला बंद करायचे आहे ना तर सर्वच दाेन दिवस बंद करा.

जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मटण, चिकन व अंडी यांची विक्री करणारी दुकाने देखील सुरू ठेवली. मात्र, कपड्यांची दुकाने, हॉकर्स यांना वस्तू विक्रीला मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हा अजब न्याय आहे, याची आम्हांला लाज वाटत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.

lockdown news
कोरोनाचे नियम पायदळी; साताऱ्यात सरपंच परिषदेचा कंदील मोर्चा

हॉटेलमधील पदार्थ विकता येतात, मटण, चिकन, अंडी विकण्यास परवानगी देता, तेव्हा मार्केटमध्ये फिरून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घ्यायला हवी. कार्यालयात बसून आदेश काढण्यात त्यांना बरे वाटतं. गरिबांच्या जीवावर उठू नका. गरिबांवर बंधने घालत असताना कारखानदारांना मात्र सूट. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात ४० अटी घातल्या आहेत. कृष्णा कारखान्याची निवडणूक होती, तोपर्यंत सगळे सुरळीतपणे सुरू होते. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा लॉकडाउन केले. तुमचा कर्ता-करविता धनी कोण, हे जनतेला माहिती आहे असा टाेलाही पवार यांनी लगावला आहे. पालकमंत्र्यांच्या हातातील ते बाहुले झाले आहेत, अशी जहाल टीकाही पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांना केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com