Sachin Waze  Saam TV
महाराष्ट्र

Sachin Vaze News: सचिन वाझेंकडून कारागृहातून पुस्तक लिहू देण्याची मागणी; कारागृह प्रशासनाने दर्शवला विरोध

Sachin Vaze demand to write a book from prison: पुस्तकं लिहण्यासाठी आणि त्याच्या विरोधातील तांत्रिक पुरव्यांचं अध्ययन करण्यासाठी आपल्याला एक संगणक देण्यात यावा अशी मागणी विशेष NIA कोर्टाकडे केलीय मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Taloja Central Jail:

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कारागृहातून पुस्तक लिहू देण्याच्या मागणीला कारागृह प्रशासनाने विरोध केला आहे. या मागणीचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत कारागृह प्रशासनाने विरोध दर्शवला आहे.

सचिन वाझे अँटिलिया स्फोटक आणि मन्सुख हिरेन हत्ये प्रकरणी सध्या तळोजा कारागृहात आहेत. पुस्तकं लिहण्यासाठी आणि त्याच्या विरोधातील तांत्रिक पुरव्यांचं अध्ययन करण्यासाठी आपल्याला एक संगणक देण्यात यावा अशी मागणी विशेष NIA कोर्टाकडे केलीय मागणी केली आहे.

सचिन वाझेंना जेलमधून ‘Treatise on Anti-Terrorism and Allied Laws’ नावाचे पुस्तक लिहायचे आहे. प्रविण महाजन यांनी मृत्यूपूर्वी ऑर्थर रोड कारागृहात पुस्तक लिहिले होते. या पुस्तकामुळे मोठा राजकीय वाद झाला होता. जर वाझेंना परवानगी दिली तर उद्या दहशतवादी आणि नक्षलवादी देखील अशा प्रकारांची परवानगी मिळवतील. त्यामुळे देशविघातक कृत्यांसाठी गैरवापर होण्याची भीती आहे, असं कारागृह प्रशासनाने विरोध करताना म्हटलंय.

कारागृहात सायबर तज्ञ तसेच कॉम्प्युटर आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रत्येक इंटरनेट वापरावर देखरेख ठेवता येणे शक्य नाही, त्यामुळे सचिन वाझे यांच्या कारागृहातून पुस्तक लिहू देण्याच्या मागणीला कारागृह प्रशासनाने विरोध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT