राहुल गांधींना संपवण्याचा हा कट तर नाही ना? नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा Saam Tv News
महाराष्ट्र

राहुल गांधींना संपवण्याचा हा कट तर नाही ना? नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

राहुल गांधींना संपवण्याचा हा कट तर नाही ना? असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर केला आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress Leader) नाना पटोले (Nana Patole) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेबाबत (Rahul Gandhi's Security) गंभीर सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. ''राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिकमध्ये 'व्यर्थ न हो बलिदान' या कार्यक्रमात ते बोलत होते. (Isn't this a plot to end Rahul Gandhi? Nana Patole targets the government)

हे देखील पहा -

नोटबंदी झाल्यानंतर आतंकवाद संपेल असं सरकारने सांगितलं होतं, पण आतंकवाद संपला का? १५ लाख रुपये तर सोडाच पण, काळापैसा आला का? एवढी मोठी यंत्रणा असताना राहुल गांधींपासून ५०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला. राहुलजी असलेल्या ठिकाणी आतंकवादी कसे पोहोचले? असा गंभीर प्रश्न नाना पटोलेंनी उपस्ठित केला. तसेच देशासाठी गांधी कुटुंबातील दोन लोकांनी बलिदान दिलं, जे राहुलजी देशाच्या जनतेचा आवाज बनून देशासाठी काम करतायत, त्या राहुल गांधींना संपवण्याचा हा कट तर नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या जम्मू - काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी जम्मू - काश्मीरमधील अनेक धर्मस्थळांना भेट दिली. जम्मू - काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट दिली. त्यानंतर खीर भवानी मंदिरात गेले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या जम्मू - काश्मीरमधील प्रभारी रजनी पाटील होत्या.

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. तेव्हापासून नाना पटोले हे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडून अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली जातात ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत वारंवार मिळतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT