Raigad Irshalwadi Landslide SAAM TV
महाराष्ट्र

Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग, 'या' ६ एकर जागेवर बांधली जाणार घरं

Rehabilitation Work Of Irshalwadi Villagers: मानिवली गाव हद्दीतील गुरचरण जागेपैकी सुमारे 6 एकर जागेत इर्शाळवाडी दरडग्रस्तांचे पुर्नवस होणार आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

Khalapur Irshalwadi News: इर्शाळवाडी दुर्घटनेला (Irshalwadi Landslide News) १२ दिवस पूर्ण झाले आहेत. या दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीच्या दरडग्रस्त ग्रामस्थांना कायमस्वरूपी पुर्नवसनाच्या (rehabilitation work of irshalwadi villagers) कामाला वेग आला आहे.

चौक येथील मानिवली गावतील शासनाच्या मालकीची जमीन इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांचे पुर्नवसन करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. मानिवली गाव हद्दीतील सर्वे क्रमांक 27 / 1 ब या गुरचरण जागेपैकी सुमारे 6 एकर जागेत इर्शाळवाडी दरडग्रस्तांचे पुर्नवस होणार आहे. या जागेचे मोजमाप करुन शासन दरबारी प्रस्ताव देखील सादर झाला आहे.

खालापूरनजीकच्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळगडावर 19 जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण इर्शाळवाडी मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. या गावामध्ये जवळपास ४५ पेक्षा जास्त घरं होती. फक्त ५ घरातील सदस्य या दुर्घटनेमध्ये बचावले बाकी सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले. या दरड दुर्घटनेत जवळपास 84 ग्रामस्थ ढिगाऱ्याखाली अडकले होते.

तीन दिवसांच्या बचावकार्यादरम्यान बचाव पथकाने एका महिलेला सुरक्षित बाहेर काढले. तर शोधकार्यात 27 ग्रामस्थांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर ५७ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले नाही. सतत पडणारा मुसळधार पाऊस धुके आणि चिखलामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. पण मृतदेहाचे विघटन होण्यास सुरुवात झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. 57 ग्रामस्थांना बेपत्ता जाहीर करून मृत घोषित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

इर्शाळवाडीवरील 42 कुटुंब सध्या शासनाने दिलेल्या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहत आहेत. आज या दरड दुर्घटनेला 12 दिवस पूर्ण झाले असुन दुर्घटनास्थळी शनिवारी मृतांचे सामूहिक उत्तरकार्य करण्यात आले. यानिमित्ताने शनिवारी दिवसभर या ठिकाणी पिंडदान, मृतांचे पूजन आदी धार्मिक विधी करण्यात आले. मृतांचे नातेवाईक, अप्तष्ट या ठिकाणी सांत्वनासाठी एकत्र आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT