irrigation department issued notice to sambhajinagar municipal corporation on pending 40 crore amount Saam Digital
महाराष्ट्र

Sambhajinagar : जलसंपदा विभागाचे कठाेर पाऊल, काेणत्याही क्षण संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार; जाणून घ्या कारण

chhatrapati sambhajinagar water supply : छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी रुपये थकीत ठेवले आहे. ही थकीत रक्कम तातडीने भरावी यासाठी महापालिकेला जलसंपदा विभागाने नोटीस बजावली आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागविण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून (jaykwadi dam) १३० ते १३५ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचे बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावे लागते.

मागील काही वर्षांपासून महापालिकेने पैसे भरले नाहीत. फेब्रुवारी महिन्यात जलसंपदा विभागाने ४० कोटींची थकबाकी भरावी म्हणून नोटीसही दिली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने काही तास पाणीपुरवठा थांबविला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

15 चे 40 काेटी झाले, व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही

जलसंपदा विभागाला पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत. संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केली असे मनपातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी काही ठराविक रक्कम मनपाकडून भरण्यात येते. व्याज आणि दंड मनपा भरू शकत नाही असेही अधिकारी सांगताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT