Nagpur Saam
महाराष्ट्र

Nagpur: आधी लग्नाचे आमिष अन् लैंगिक अत्याचार, आयपीएस अधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल

IPS Officer Promised Marriage Committed Physical Assault: नंदुरबार जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नंदुरबारमधील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका महिला डॉक्टरने हे गंभीर आरोप केले असून, आयपीएस अधिकाऱ्याविरोधात नागपूरमधील इमामवाडा पोलीस ठाण्यात अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दर्शन दुगडे असे आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिलेने इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुरूवातीला पीडित महिला डॉक्टर आणि आयपीएस दर्शन दुगडे यांची ओळख एमबीबीएस शिक्षण घेत असताना इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दर्शन यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवले.

महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला हॉटेलमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. असा गंभीर आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर महिलेने दर्शनला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा त्यांनी लग्नास नकार दिला, असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

इमामवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. तसेच तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT