RCB IPL 2025 Winner x
महाराष्ट्र

RCB चा विजय आणि कोल्हापूरच्या आडी गावात मोठा जल्लोष, पेढे वाटून साजरा केला आनंद, बाईक रॅली अन्... पाहा व्हिडीओ

RCB IPL 2025 Winner : कोल्हापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या निपाणी तालुक्यातील आडी गावात RCB जिंकल्यानंतर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. आडीतील सिद्धेश्वर मठाजवळ मोठी स्क्रिन लावण्यात आली होती.

Saam Tv

निपाणी (प्रतिनिधी): कोल्हापूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकमधील निपाणी तालुक्यातील आडी गावात RCB चा विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात RCB ने जबरदस्त कामगिरी करत विजयी झेंडा फडकावला आणि या विजयाचं उत्सवमय रूप आडी गावात पाहायला मिळालं.

सिद्धेश्वर मठाजवळ गावकऱ्यांनी खास व्यवस्था करत मोठी LED स्क्रीन लावली होती. संपूर्ण सामन्यादरम्यान गावकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रत्येक चौकार-षटकारावर जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं.

RCB चा विजय निश्चित होताच गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला. विशेष म्हणजे या आयोजनामध्ये स्थानिक युवकांचा मोठा सहभाग होता. दरम्यान, लाल-पिवळा झेंडा हातात घेऊन गावातून तरुणांनी बाईक रॅली काढली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय साजरा केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२५ ची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली आहे. २००८ पासून आता आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात बंगळुरूच्या संघाने इतिहास रचला आहे. या विजयामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंद-उत्साह पाहायला मिळत आहे. सामना जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष होत असल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शुक्ल पंचमीनिमित्त आजचा शुभ दिवस; कोणत्या राशींना आर्थिक फायदा?

Maharashtra Live News Update : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका - माजी मंत्री महादेव जानकर

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT