Congress Symbol Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; एका गटाचा अडबाले, दुसऱ्याचा झाडेंना पाठिंबा, प्रदेशाध्यक्षांचं अजून ठरेना!

Congress News: काँग्रेसमध्ये नेमकं चाललं काय हा प्रश्न पडलाय

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. या निवडणुकीत माजी मंत्री सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहिर केलं.

तर दुसरीकडे आज माजी आमदार आशिष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना परस्पर समर्थन जाहीर करून टाकलं. तिकडे पक्षाचे आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजून समर्थन जाहीर केलेलं नाही हे सांगण्यात येत आहे. त्यामुळं काँग्रेसमध्ये नेमकं चाललं काय हा प्रश्न पडलाय.

नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघात काल काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या अनुपस्थित बैठक घेत सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केलं. तर आज आशिष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना समर्थन जाहीर करत धक्काच दिला.

पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीचे समर्थन काँग्रेसने घेतले होते, त्या बदल्यात शिक्षक मतदार संघात शिक्षक भारतीच्या उमेदवाराला समर्थन देण्याचा शब्द काँग्रेस नेत्यांनी दिला होता, त्यामुळं तोच शब्द पळत असल्याचं सांगत नाना पटोले यांच्यावर आरोप आशिष देशमुख यांनी केले.

नाना पटोले यांनी अद्याप आम्ही समर्थन जाहीरन केल्याचं सांगत मी संस्थानिक नाही, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसल्याचं सांगत आशिष देशमुख यांना उत्तर दिलं. तिकडे नाशिक मध्ये पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची मोठी नाचक्की झाल्यावर आता नागपुरातील शिक्षक मतदार संघात काँग्रेसची डोकेदुखी दूर होताना दिसत नाहीय. त्यामुळं काँग्रेसचेच नेते काँग्रेस संपवायला लागलीय, अशी चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाने ४-५ वाहनांना उडवलं, परिसरात खळबळ

लवकरच सीमा बदलणार, सिंध मिळणार; विना लढाईचं PoK येणार भारतात: संरक्षण मंत्री

प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; घरातील जवळच्या व्यक्तीचं निधन

SCROLL FOR NEXT