Jalna News: आठ किलो गांजा जप्‍त; स्थानिक गुन्‍हे शाखेची रेल्‍वे स्‍टेशन परिसरात कारवाई

आठ किलो गांजा जप्‍त; स्थानिक गुन्‍हे शाखेची रेल्‍वे स्‍टेशन परिसरात कारवाई
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

जालना : रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी (Police) कारवाई करत आठ किलो गांजा जप्त करत दोन लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. (Maharashtra News)

Jalna News
Buldhana News: चार वर्षीय बालकाने गिळले २ रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव

जालना शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात काही जण दुचाकीवरून गांजा विक्री करत असल्याच्या माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळ असलेला आठ किलो गांजा दुचाकी असा अंदाजे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोघे ताब्‍यात

पथकातील पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात साफळा रचत दुचाकीवरून दोन संशयित तरुण पोत्यात काही तरी नेत असल्याचे लक्षात आले. यानंतर पथकातील पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांच्याजवळ तब्बल आठ किलो गांजा आढळून आला. दुचाकीसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगून त्यांची अवैधरित्या विक्री करण्याचा प्रयन्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com