State Election Commission Saam Tv
महाराष्ट्र

मार्कर शाई पुसलीच जात नाही, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, आयोगाकडून स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय म्हणाले...

voting ink controversy BMC Election : शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही आणि २०११ पासून तीच शाई वापरली जात असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

State Election Commission clarification on voting ink controversy : महापालिका निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून आणि सर्वसामान्यांकडून करण्यात आला. त्याबाबतचे पुरावेही देण्यात आले. यावर राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळण्यात आले. दुबार मतदाराची पूर्ण ओळख पटल्याशिवाय मतदान करू दिले जात नाही. दुबार मतदाराला दोन ओळखपत्र मागितले जात आहेत. ज्या ठिकाणी बोगस मतदान झालेय, त्या मतदारावर कारवाई झाल्याचे वाघमारेंनी सांगितले. (Dinesh Waghmare rejects erasable ink allegations)

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शाई पुसली जात असल्याचे आरोप फेटाळले. फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधकांवर केला. आम्ही सत्ताधाऱ्यांना कोणतीही मदत करत नाही, निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात असल्याचे स्पष्टीकरणही वाघमारे यांनी दिले.

केंद्रीय निवडणूक आयोग वापरत असलेला मार्कर पेन आणि शाई आम्ही वापरत आहे. २०११ पासून हीच शाई आणि मार्कर पेन पावरला जातोय. सुकल्यानंतर ही शाई पुसली जात नाही, असे दिनेश वाघमारे यांनी ठामपणे सांगितले. त्याशिवाय विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला.

लोकसभा विधानसभा मतदाना वेळीही शाई पुसली जात असल्याचा आरोप, तक्रारी करण्यात आला. पण शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही, असे दिनेश वाघमारे म्हणाले. २०११ पासून तोच मार्कर वापरला जातोय. पण आताच का फेक नरेटिव्ह पसरवला जातोय. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न उरत नाही. आयोग निष्पक्ष काम करत आहे. आम्ही कुणाला फेवर करत नाही. मुद्दाम संभ्राम तयार केला जातोय. फेक नरेटिव्ह तयार केला जातोय. सर्व आयोगावर ढकलले जातेय.

कोरसचा मार्कर असल्याने शाई पुसली जाते? नेलपेंट काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या लिक्विडमुळेही शाई फुसली जाते, असा प्रश्न विचारला असता वाघमारेंनी सर्व आरोप फेटाळून लावले. २०११ पासून आम्ही एकाच कंपनी कोरसचा मार्कर वापरतो. दुसऱ्या कंपनीचा मार्कर वापलेला नाही. शाईबाबत संभ्राम पसरवला जातोय. शाई पुसल्याचा आरोप चुकीचा आहे. आमच्या सचिवांनीही आज सकाळी मतदान केले, त्यांची शाई पुसली गेली नाही, असे दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांवर कोणाची 'दादागिरी' चालणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam TV exit poll : पनवेलकरांचा कौल भाजपच्या बाजूने, शिंदेंना फक्त ३ जागा, वाचा सर्व्हेचा अंदाज काय सांगतोय

Saam Tv Exit Poll: नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नडले पण आणि जिंकणे पण...!

भाजपची लाट! २९ महापालिकांवर झेंडा, शिंदे-पवारांची गरज कुठे? ठाकरे बंधूंना किती जागा? पाहा महा एक्झिट पोलचा अंदाज

Trendy Kurta Desing: कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' सुंदर ट्रेंडी कुर्ता

SCROLL FOR NEXT