Accident : ट्रॅक्टर-पिकअपची समोरासमोर जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Bhopal Accident Today : भोपाळजवळील बेरासिया परिसरात ट्रॅक्टर आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
Madhya Pradesh road accident
Madhya Pradesh road accident Google
Published On

five people killed in Madhya Pradesh road accident today : ट्रॅक्टर आणि पिकअपची समोरासमोर जोरात धडक झाल्यामुळे भयंकर अपघात झाला. या भयानक अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण गंभीर जखमी झाले. मध्य प्रदेशमधील भोपाळजवळच्या बेरासियात बुधवारी रात्री उशिरा हा भयंकर अपघात झाला. मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा स्नान करून परतणाऱ्या भाविकांवर ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले.

बेरासिया परिसरात अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमासाठी जवळच्या सरकारी रूग्णालयात पाठवले. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत, यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. १० जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Madhya Pradesh road accident
Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ट्रॅक्टर आणि पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नर्मदापुरमला जाणारे पिकअप आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्नान करून नर्मदापुरमहून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरात धडक झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Madhya Pradesh road accident
मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, मुंबईच्या १४६ क्रमांकाच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

१० जण जखमी

४० वर्षीय मुकेश अहिरवार, ६० वर्षीय बाबरी बाई, १४ वर्षीय दीपक, ६० वर्षीय लक्ष्मी बाई आणि ६० वर्षीय हरी बाई यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींना हमीदिया रुग्णालय आणि भोपाळमधील इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले.

Madhya Pradesh road accident
Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

अपघात नेमका झाला कसा ?

ट्रॅक्टर आणि पिकअपचा हा अपघात नेमका झाला कसा? याचं कारण पोलिसांनी शोधले जात आहे. अपघातामधील जखमींचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. पिकअपमधील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांसह झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Madhya Pradesh road accident
Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com