indurikar maharaj saam tv
महाराष्ट्र

Indurikar maharaj: इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल; आज कोर्टात सुनावणी, काय आहे प्रकरण?

Indurikar maharaj: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर PCPNDT कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

indurikar Maharaj News:

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर PCPNDT कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी इंदुरकरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी इंदुरीकर महाराज स्वतः कोर्टात हजर राहाणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest marathi News)

अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी २०२० मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै २०२० मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या वक्तव्यावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी इंदुरीकरांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने इंदुरीकरांना गुन्ह्यातून मुक्त केल्यानंतर अंनिसने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून इंदुरीकर महाराजांविरोधात खालच्या कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानुसार इंदुरीकर महाराजांवर दाखल प्रकरणाची संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. (latest marathi News)

या सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज स्वतः हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: महाराष्ट्रातील मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, परफॉर्मन्स ऑडिट होणार; नेमकं कारण काय?

Taj Hotel viral video : पायात कोल्हापुरी चप्पल, खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्याने ताज हॉटेलमध्ये वाद; महिलेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पुतण्याची चाकू भोसकून हत्या; क्षुल्लक कारणावरून संपवलं, कारण काय?

Soft Chapati Tips: मऊ अन् फुलणारी चपाती बनवण्याचे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: मनमाड शहरात विजांच्या गड गडाटासह जोरदार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT