Nashik Crime News: नाशिकचं भविष्य अंधारात; शाळकरी मुलं ड्रग्जच्या आहारी

Nashik Crime: ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि भूषण पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे ड्रग्ज आता ग्रामीण भागात पोहोचण्याची भीती वाढलीय.
Nashik Crime:
Nashik Crime:Saam Tv
Published On

तरबेज शेख

Nashik Crime:

राज्यातील युवा पिढी ड्रग्जची विळख्यात सापडली आहे. मेट्रो सिटीमध्ये आणि मोठं-मोठ्या रेव्ह पार्टीपुरते सीमित राहणारे ड्रग्ज आता सामन्य माणसांच्या शरीरात जाऊ लागले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि भूषण पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाईमुळे ड्रग्ज आता ग्रामीण भागात पोहोचण्याची भीती वाढली आहे. (Latest News)

मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई केल्यानंतर देखील नाशिकमध्ये ड्रग्ज सेवन केलं जात असल्याचं समोर आलंय. नाशिकमध्ये अमली पदार्थाची मोठे प्रमाणात विक्री होत आहे. शाळा व महाविद्यालयात तरुण-तरुणी या जीवघेणा व्यसनाच्या आहारी जात आहेत. साम टीव्हीच्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. साम टीव्ही नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी हा ग्राउंड रिपोर्ट केलाय. या रिपोर्टमध्ये नाशिकमधील शाळकरी मुलं मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेल्याचं समोर आले आहे.

नाशिकरोड भगत राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ वर्षाचा मुलगा नशेच्या आहारी गेला. आपलं व्यसन पूर्ण करण्यासाठी तो रोज काहीतरी कारणं सांगून आई-वडिलांकडून नाशा करण्यासाठी पैसे घ्यायचा. दरम्यान पालकांनी त्याच्या शाळेच्या बँगेची तपासणी केली, तेव्हा त्यांना त्यांच्या बँगेत नशेची पुडी मिळाली होती. त्यानंतर त्या मुलाच्या घरच्यांनी त्याची पॉकेटमनी बंद केली. या तरुणाला नशा करण्यास मिळत नसल्याने तो घरी भांडण करायला लागला. नशा करण्यासाठी त्याने आपली सायकल विकली. त्या मुलाची व्यसन वाढल्याचं समजताच त्याच्या पालकांनी त्याला उपचारासाठी डॉक्टरकडे नेले.

या ग्राउंड रिपोर्टमधून दुसरी एक धक्कादायक गोष्ट देखील समोर आली आहे. नाशिकच्या एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या स्थितीत ३० ते ३५ मुलं हे व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यामध्ये फक्त एमडी ड्रग्ज नव्हेतर चरस, गांजा, ब्राऊन शुगर, अफू ची नशेत मुलं अडकली आहेत. तर काही तरुण आयोडेक्स आणि व्हाइटनरचीदेखील नशा करत होते. आता हे तरुण व्यसनमुक्ती केंद्रमध्ये उपचार तसेच समुपदेशन घेत आहेत. या मुलांना मानसिक आजारदेखील जडल्याची धक्कादायक माहिती व्यसनमुक्ती केंद्र चालक विवेक होणराव यांनी दिलीय.

शालेय वयातच मुलं व्यसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनाच्या आहारी गेल्याने या मुलांचे पालक चिंतेत सापडले आहेत. उद्याच्या भारताचे भविष्य असणारी पिढी जर व्यसनाधीन होत असेल तर चिंता करण्याची गरज आहे. उद्याच्या उज्वल भारताची पिढी ही व्यसनातून मुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना आलीय.

Nashik Crime:
Mumbai- Nashik Highway: मुंबई- नाशिक महामार्गावर चक्काजाम; धनगर समाजाला आरक्षण विरोधात आदिवासींचे आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com