Indurikar Maharaj  Saam Digital
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांना दिलासा, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Indurikar Maharaj: निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून देखील आज ते सुनावणीलाअनुपस्थित राहिले. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indurikar Maharaj

निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून देखील आज ते सुनावणीलाअनुपस्थित राहिले. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून इंदोरीकर महाराजांना दिवाळी काळापुरता दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर होणार आहे.

अपत्य प्राप्तीबाबत इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर संगमनेर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र ते समन्स बजावून देखील आज सुनावणीला अनुपस्थित राहिले. दरम्यान इंदोरीकर महाराजांच्या वतीने वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीला आणि जामीन घेण्यासाठी इंदोरीकर महाराज न्यायालयात येणार का ? याकडे लक्ष लागले आहे. मूळ फिर्यादीच्या अर्जावरही २१ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंदोरीकर महाराज यांनी २०२० मध्ये शिर्डी येथील ओझरमध्ये एका किर्तनाच्या कार्यक्रमात अपत्य प्राप्तीसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संगमनेर सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची गुन्ह्यातून मुक्ता केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने हा खटला संगमनेर सत्र न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT