Amaravati Digital Orange Market Saam Tv
महाराष्ट्र

Digital Orange Market: देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

Amaravati News: संत्र्याला बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. एकीकडे बांगलादेश मधील निर्यात शुल्क वाढल्याने शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Amaravati Digital Orange Market

संत्र्याला बाजारभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. एकीकडे बांगलादेश मधील निर्यात शुल्क वाढल्याने शेतकऱ्यांना परवडणारा नाहीये. त्यामुळे कवडीमोल भावात संत्र्याची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते.

यातच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरीदारांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारण्यात आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमरावती जिल्ह्यातील आंबट आणि गोडसाठी येथील संत्रे जगभरात प्रसिद्ध आहेत. विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत, जिल्ह्यात संत्राच सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडलाय. दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकला जाणाऱ्या संत्राला निर्यात शुल्क जास्त लागतोय. त्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही.  (Latest Marathi News)

या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो. इतकच नाही तर शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात. यासह शेतकऱ्यांनी आणलेला संत्राला डिजिटल मशीनमध्ये टाकण्यात येतो.

यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केला जातो. याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो. यावर्षी संत्र्याला 106 रुपये किलो असा भाव मिळालाय. त्यामुळे परिसरातीलच नाही तर, नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी सुद्धा संत्रा वरुड बाजार समितीत विकण्यास आणत आहे. भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT