Newly upgraded Rajya Rani Express standing at platform – now featuring modern AC and non-AC seating coaches for better comfort  saam tv
महाराष्ट्र

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Mumbai-Nanded Rajya Rani Express: भारतीय रेल्वेने हजूर साहिब नांदेड-मुंबई सीएसएमटी राज्य राणी एक्सप्रेसला नवीन कोच रचनासह अपग्रेड केले आहे. प्रवाशांच्या आरामात वाढ करण्यासाठी आता या ट्रेनमध्ये एसी सीटिंग आणि नॉन-एसी जनरल सीटिंग कोच असतील.

Bharat Jadhav

  • राज्य राणी एक्सप्रेस ही हजूर साहिब नांदेड ते मुंबई CSMT दरम्यान धावणारी महत्त्वाची एक्सप्रेस आहे.

  • या ट्रेनची रचना सुधारण्यात आली असून आता AC सीटींग आणि सामान्य सीटींग कोच असतील.

  • पूर्वी ही ट्रेन मनमाडपर्यंत मर्यादित होती, परंतु आता तिचा प्रवास वाढवण्यात आला आहे.

  • दक्षिण मध्य रेल्वे विभागाने ही सुधारणा करून प्रवाशांना अधिक सुविधा दिल्या आहेत.

हजूर साहिब नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे - दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. ही ट्रेन राज्य राणी एक्सप्रेस श्रेणीतील एक एक्सप्रेस ट्रेन आहे. ही एक्स्प्रेस भारतातील हजूर साहिब नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते. (Indian Railways upgrades Hazur Sahib Nanded to Mumbai CSMT Rajya Rani Express)

आधी ही एक्स्प्रेस मनमाड ते लोकमान्य टर्मिनस दरम्यानचा प्रवास करायची मात्र त्यानंतर या ट्रेनचा प्रवास वाढवण्यात आला. आता राज्य राणी एक्सप्रेस ट्रेन आता नव्या रुपात येणार आहे. या एक्स्प्रेसचा आसान व्यवस्थे बदल करण्यात आलाय. रेल्वे मुंबई - नांदेड राज्यराणी एक्सप्रेस सुधारित संरचनेसह चालवली जाणार आहे. त्यामध्ये १ वातानुकूलित सीटींग श्रेणी (बैठक व्यवस्था) आणि २ सीटींग सामान्य श्रेणी (वातानुकूलित नसलेले) यांचा समावेश असणार आहे.

रेल्वे यापुढे ट्रेन क्रमांक १७६१२ / १७६११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस सुधारित रचनेसह चालवली जाणार आहे. नवीन संरचनेत १ वातानुकूलित सीटींग श्रेणी (बैठक व्यवस्था) आणि २ सीटींग सामान्य श्रेणी (वातानुकूलित नसलेले) समावेश असणार आहे.

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

ट्रेन क्रमांक 17612 / 17611 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेसची सुधारित संरचना

संरचना: १ प्रथम वातानुकूलित व द्वितीय वातानुकूलित श्रेणी, १ द्वितीय वातानुकूलित श्रेणी, ३ तृतीय वातानुकूलित श्रेणी, १ वातानुकूलित आसन व्यवस्था श्रेणी (चेअर कार), ५ शयनयान श्रेणी, २ आरक्षित नॉन-एसी चेअर कार, २ सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित) आणि २ द्वितीय आसन व्यवस्था व सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

ट्रेन क्रमांक १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहेब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ५.०८.२०२५ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुधारित संरचनेसह धावेल.

नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी एक्सप्रेस भारतीय रेल्वे - दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील राज्य राणी एक्सप्रेस श्रेणीतील एक ट्रेन आहे. ही एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावते. हजूर साहिब नांदेड-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्य राणी सुपरफास्ट एक्सप्रेस ५९४ किलोमीटरचा प्रवास करते. ही एक्स्प्रेस ५९४ किलोमीटरचं अंतर १२ तास ०० मिनिटांत (५५.४७ किमी/तास) पूर्ण करते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनचा सरासरी वेग ५५ किमी/तास पेक्षा जास्त असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT