
कोकण रेल्वेकडून 'कार ऑन ट्रेन' सेवा गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली आहे.
या सेवेच्या माध्यमातून प्रवासी आपली कार थेट ट्रेनने कोकणात पाठवू शकतात.
रो-रो (Roll-On Roll-Off) तंत्रज्ञानाचा वापर करून कार वाहतूक केली जाते.
या सेवेचे बुकिंग ऑनलाईन आणि स्थानिक कार्यालयांमार्फत करता येते.
गणेशोत्सवासाठी तुम्ही कार घेऊन कोकणात जाण्याचा प्लॅन करत आहात? तुम्हाला माहितीये, कोकण रेल्वेनं एक खास सुविधा सुरू केलीय, ती म्हणजे तुम्ही रेल्वेतून तुमची कार नेऊ शकतात. हो, रेल्वेकडून 'कार ऑन ट्रेन' (Car on Train) अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. म्हणजेच रो-रो सेवेचा वापर करत मालवाहू ट्रक्स ज्याप्रमाणे वाहून नेले जातात, त्याचप्रमाणे कार नेण्याची सुविधा कोकण रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आलीय. (Konkan Railway car transport charges and booking process)
कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता आपापल्या चारचाकी गाड्या घेऊन थेट कोकणात जाता येणार आहे. पण कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेचा लाभ घेण्यासाठी किती शुल्क भरावे लागेल, बुकिंग कसं करायचं हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाऊन घेणार आहोत. रो-रो सेवा ही कोलाड ते गोव्याच्या वेर्णेपर्यंत असणार असून सध्या ही सेवा निवडक स्थानकांवर उपलब्ध आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर बुकिंग करता येणार आहे. तिकीट बुकिंग करताना कार कोणती आहे, तिचा आकार आणि तुम्हाला कुठे जायचंय? याची माहिती द्यावी लागेल.
कोलाड - वेर्णा- कोलाड अशा स्थानकांवरुन ही सेवा सुरू होणार आहे.
प्रस्थान वेळ- संध्याकाळी ५ वाजता
पोहोचण्याची वेळ- दुसऱ्या दिवशी सकाळी ५
रिपोर्टिंग वेळ- प्रस्थानाच्या दिवशी दुपारी २ पर्यंत
कोलाड ते वेर्णाः २३,२५, २७, २९, ३१ ऑगस्ट आणि २,४,६,८,१० सप्टेंबर
वेर्णा ते कोलाडः २४, २६,२८, ३० ऑगस्ट आणि १,३,५,७,९,११ सप्टेंबर
किती असणार शुल्क?
प्रति कार ७,८७५ (5 टक्के जीएसटी सह)
बुकिंग करताना- ४ हजार
उर्वरित रक्कम- ३,८७५ प्रस्थानाच्या दिवशी स्टेशनवर भरावी लागेल.
प्रति ट्रिप क्षमताः ४० कार ( २० वॅगन* प्रत्येकी २ कार)
प्रवाशांना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, १६ कार बुक झाल्यानंतरच ट्रिप सुरू होईल, अन्यथा शुल्क परत दिले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.