Indian Railways food booking google
महाराष्ट्र

Indian Railways : प्रवाशांना दिलासा! राजधानी-शताब्दी नव्हे तर आता इतर रेल्वेमध्येही मिळणार जेवण

Train Food Booking : भारतीय रेल्वेने राजधानी, वंदे भारतसह आता सामान्य गाड्यांमध्येही तिकीट बुकिंगदरम्यान जेवण बुकिंगची सोय उपलब्ध केली आहे. प्रवाशांना प्रवासात अधिक सोयीस्कर सुविधा मिळणार.

Sakshi Sunil Jadhav

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. सामान्य गाड्यांमध्ये मिळणारे पाणी आणि मिळणारे अन्नपदार्थ हे कमी दर्जाचे असतात. असे रेल्वे प्रवाशांचे मत आहे. याचाच विचार करुन भारतीय रेल्वेने एक सुविधा सुरु केली आहे. त्यामध्ये तुम्हाला तिकीट बुकिंगच्या वेळीच फूड बुक करण्याची सुविधा सुरु केली आहे.

आतापर्यंत ही सुविधा फक्त राजधानी, शताब्दी, वंदे भारत अशा प्रीमियम गाड्यांमध्येच उपलब्ध होती. मात्र, सामान्य मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना प्रवासादरम्यान विक्रेत्याकडून अन्न खरेदी करावे लागत होते. ज्यामुळे अनेकदा जास्त शुल्क आकारले जात होते. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता.

रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरुवातीला भारतातील सर्वात लांब अंतराच्या दिब्रुगड-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेसमध्ये सुरू केली होती. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ती आता २० गाड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत ही सुविधा ५० गाड्यांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. आयआरसीटीसीच्या सिस्टीमवरून तिकीट बुक करताना प्रवाशांना एक पॉप-अप मिळतो. त्यावर क्लिक करून व्हेज किंवा नॉन-व्हेज जेवण बुक करता येते. ज्या प्रवाशांना जेवण नको असेल तर त्यांनी ते सहज बुकींग टाळू शकतात.

रेल्वेने केलेल्या या उपक्रमामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अनधिकृत विक्रेत्यांकडून जास्त पैसे देऊन अन्न खरेदी करण्यापासून दिलासा मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते ही चाचणी यशस्वी ठरत असून पुढील काळात ती अधिकाधिक गाड्यांमध्ये लागू करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT