Sakshi Sunil Jadhav
तांदळाची उकड व्यवस्थित मळून घ्या. कारण कणीक मऊसर झाली की पाकळ्या छान उमटतात.
मोदकासाठी लहान लाटलेली उकड जास्त जाड ठेवू नका.
लाटलेली उकड गोलसर करा. मध्ये सारण ठेवण्यासाठी जागा ठेवा.
नारळ-गुळाचे सारण किंवा आवडीचे सारण ठेवा. जास्त भरणं टाळा. अन्यथा पाकळ्या बंद होणार नाहीत.
अंगठा आणि तर्जनीने हलक्या दाबाने दुमडायला सुरुवात करा. त्याची एक एक पाकळी करा.
सगळ्या पाकळ्या एकाच मापाच्या करा. त्यात तेवढंच अंतर ठेवा. डावीकडून उजवीकडे फिरवत पाकळ्या घ्या.
पाकळ्या जाड झाल्यास मोदक घट्ट दिसतो. पातळ ठेवल्यास २१ पाकळ्या आरामात बसतात.
सुरुवातीला ५-५ पाकळ्या करून गट तयार करा. मग मध्ये मध्ये १-१ पाकळी वाढवत २१ पूर्ण करा.
सर्व पाकळ्या छानपणे एकत्र करून शेंड्याला चिमटीत बंद करा. असं केल्याने मोदक सुंदर दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.