Chandrakant Patil addresses party workers amid discussions on major political changes ahead of 2029 elections. 
महाराष्ट्र

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Expansion of Parliamentary and Assembly Seats: २०२९ च्या निवडणुकांपूर्वी भारतात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या जागा ६५० पर्यंत वाढणार आहेत.यासह विधानसभेच्या जागाही वाढणार आहेत.

Bharat Jadhav

  • २०२९ निवडणुकांपूर्वी मोठे राजकीय बदल संभव

  • लोकसभा जागा ६५० आणि विधानसभा ३५० पर्यंत वाढण्याची शक्यता

  • मतदारसंघ पुनर्रचनेमुळे राजकीय समीकरणे बदलणार

देशातील २०२९च्या लोकसभा निवडणुकांआधी राजकारणात मोठे बदल होणार आहेत. त्या बदलांमुळे राजकारणाचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे. २०२९ च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. या मतदारसंघ पुनर्रचनेत जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. जागा वाढण्याची आणि महिला आरक्षण लागणार असल्याची भनक लागताच भाजप कामाला लागली आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत.

या मेळाव्याला माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भगवानराव साळुंखे, संग्रामसिंह देशमुख, डॉ. रविंद्र आरळी, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, राहुल महाडिक, शरद लाड आदी उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे.

या पुनर्रचनेत विधानसभेच्या २८८ ऐवजी सुमारे ३५० मतदारसंघ तर लोकसभेत ५४४ ऐवजी ६५० खासदारांची संख्या होईल. मतदारसंघ पुनर्रचनेत सांगली जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असतील, तर विधानसभेचे ८ ऐवजी ९मतदार संघ होतील. कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी पुनरीक्षण आणि महिला आरक्षणावर बारकाईने काम करावे. बीएलओ घरी येतील त्यांना अर्ज भरून द्या. नाहीतर २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असं पाटील म्हणाले.

दरम्यान राज्यातील खासदारांचे संख्याबळ ४८ आहे त्यात वाढ केली जाणार आहे. राज्यातील खासदारांची संख्या २४ ने वाढणार आहे. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यावर २७३ जागा महिलांसाठी राखीव होतील. तेवढ्या जागांचे संख्याबळ वाढविण्याची मोदी सरकारची योजना आहे. दोन आठवड्यांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

Liver cancer early signs: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसतात?

SCROLL FOR NEXT