बारामती निवडणूक बिनविरोध होणार नाही
बारामती पोटनिवडणुकीत ५५ उमेदवार रिंगणात
एकूण ६८ उमेदवारी अर्ज दाखल
सुनेत्रा पवारांविरोधात अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीसाठी ६ एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण ही निवडणूक बिनविरोध होणार नाही यामागचे कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती पोटनिवडणुकीसाठी ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या निवडणुकीत ५५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, बारामती पोटनिवडणूक लढण्यासाठी अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. महत्वाचे म्हणजे बारामती पोटनिवडणुकीसाठी अनेक बाहेरच्या चर्चेत असलेल्या नेत्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. करुणा मुंडे यांनी देखील सुनेत्रा पवारांविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ५५ उमेदवारांनी तब्बल ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह मावळली आहेत. महत्वाचे म्हणजे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी जरी काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी देखील सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
संतोष पोपटराव कांबळे - भारतीय देशक्रांती पार्टी
अविनाश वामनराव गायकवाड - अपक्ष
शिवाजी जयसिंग कोकरे - अपक्ष
विक्रम भरत कोकरे - अपक्ष
विजयकुमार रामचंद्र भिसे - अपक्ष
विजयकुमार रामचंद्र भिसे - इंडीयन नॅशनल काँग्रेस
विजयकुमार रामचंद्र भिसे - इंडीयन नॅशनल काँग्रेस
अशोक रामचंद्र खामगळ- अपक्ष
विराज महादेव शिंदे - अपक्ष
माऊली जमादार कांबळे - अपक्ष
सुवर्णा सुधाकर गायकवाड- इंडीयन नॅशनल काँग्रेस
सुवर्णा सुधाकर गायकवाड - अपक्ष
चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे- अपक्ष
प्रतिक्षा प्रशांत चव्हाण- आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
दशरथ नाना राऊत - भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
दशरथ नाना राऊत - भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
विलास दिलीपर घोरपडे - अपक्ष
सिद्धाराम सोमण्णा काकणकी - अपक्ष
दिनकर धारोजी गायकवाड - भारतीय जनसम्राट पार्टी
उन्मेश गणपतराव देशमुख - अपक्ष
सतिश नाना सोनावणे - अपक्ष
बाळासो मारूत धापटे - अपक्ष
राहुल बाळासो थोरात - अपक्ष
योगेश मोहनदास रतेश्वर - अपक्ष
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे - अपक्ष
आकाश विजयराव मोरे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
सिताराम विठ्ठल रणदिवे - अपक्ष
सुनेत्रा अजित पवार - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
सुनेत्रा अजित पवार - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
सुनेत्रा अजित पवार - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
सुनेत्रा अजित पवार - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
मंगलदास निकाळजे - अपक्ष
मोहन विष्णू राऊत - अपक्ष
साजन भगवान आडसुळ - अपक्ष
त्रिभुवण मधुकर पद्माकर - अपक्ष
संदिप जनार्दन खरात - अपक्ष
रोहित राजू भोसले- अपक्ष
अमोल यशवंत कोकरे - अपक्ष
सोनाली सूर्यकांत राणे - अपक्ष
सोनाली सूर्यकांत राणे - अपक्ष
करुणा धनंजय मुंडे - स्वराज्य शक्ती सेना
महेंद्र अशोक ताटे - अपक्ष
उमेश महादेव म्हात्रे - अपक्ष
चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष
स्वप्निल गजेंद्र ढेरे - अपक्ष
खिझर पिरजादे - अपक्ष
दिनकर धारोजी गायकवाड - भारतीय जनसम्राट पार्टी
सचिन शंकर आगवणे - राष्ट्रीय समाज पक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.