Indian Pitta Saam Tv
महाराष्ट्र

खेड चिपळुणात हाेताेय ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेतील Indian Pitta चा किलबिलाट

हा पक्षी फार उंचावर न बसता जमिनीपासून पाच-सहा फुटांवरच्या फांद्यांवर आणि बऱ्याचदा जमिनीवर वावरतो.

अमोल कलये

रत्नागिरी : खेड - चिपळूण (khed chiplun) परिसरात इंडियन पिट्टा (indian pitta) पक्षी (bird) आढळून आला आहे. यामुळे पक्षी प्रेमींमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. इंडियन पिट्टा यास याला मराठीत नवरंग असे संबाेधिले जाते अशी माहिती पक्षा तज्ञांनी दिली. (ratnagiri latest marathi news)

धिर वाटेकर यांना इंडियन पिट्टा पक्षी खेड - चिपळूण परिसरात दिसून आला. ते म्हणाले चिमणीपेक्षा दीड पटीनं मोठा नवरंग नऊ रंगांनी मढलेला हा पक्षा आहे. हिमालयाच्या तळटेकड्या, श्रीलंका (srilanka) आणि दक्षिण भारतात याची वीण असते. त्यामुळे आपल्याकडे केवळ स्थलांतर करण्याच्या काळात पावसाळ्याच्या सुरुवातीस तो दिसतो.

हा पक्षी फार उंचावर न बसता जमिनीपासून पाच-सहा फुटांवरच्या फांद्यांवर आणि बऱ्याचदा जमिनीवर वावरतो. याच्या रंगांची झाक मोहक असते. कपाळावर चंदेरी झाक, मधोमध काळी रेघ, डोळ्यांवर जाड, गडद काळा पट्टा, पाठीवर मळकट हिरव्या रंगावर खांद्याजवळ चमकता निळा फरकाटा, पोटावरच्या लिंबूकलरचा शेवट ओटीपोटापाशी लाल-गुलाबी होत जाणारं पिट्टाचं मोहक रुपक सर्वांना आकर्षित करते असे वाटेकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; ठाकरेंच्या आमदाराच्या निवडणूक प्रचारात CM फडणवीसांचा फोटो|VIDEO

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT