Amravati: साखळी उपाेषणास बसलेल्या शिक्षकांनी दिला सरकारला इशारा

शासनाने मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
zilla parishad teachers on hunger strike
zilla parishad teachers on hunger strikesaam tv
Published On

- अमर घटारे

अमरावती : अमरावती (amravati) जिल्हा परिषद (zilla parishad) शिक्षकांच्या (teachers) बदल्या सलग दोन वर्षापासून रखडल्या आहेत. मे २०२० व मे २०२१ या कालावधीत शासनाने शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविली नाही. शासन निर्णय असताना देखील बदली हाेत नसल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषदेने शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषद समोर तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू केले आहे. (amravati latest maathi news)

मेळघाट सारख्या दुर्गम भागातील शिक्षकांना ५ वर्षाहून अधिक काळ झाले असताना बदली प्रक्रिया शासनाने राबविली नाही. त्यामुळे शिक्षकांना परिवार सोडून राहावे लागते आहे. याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

zilla parishad teachers on hunger strike
पहिली ते नववीचे सर्व विद्यार्थी पास; शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

याबाबत करुणा बेले (जिल्हा परिषद, शिक्षिका) तसेच मनीष साव (शिक्षक संघटना, अध्यक्ष) म्हणाले दोन वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या रखडल्या आहेत. शिक्षकांना त्यांच्या मुला बाळांपासून दूर राहावे लागत आहे. तरी शासनाने याची तातडीने दखल घेऊन मागणी मान्य करावी.

Edited By : Siddharth Latkar

zilla parishad teachers on hunger strike
Satara: वीस हजार रुपयांची लाच घेताना हवालदारास ACB ने पकडले
zilla parishad teachers on hunger strike
लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com