Raigad Saam
महाराष्ट्र

Raigad: 'पाकिस्तानला समर्थन' रायगडच्या युवकाची पोस्ट व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

Youth Arrested for Pro-Pakistan Social Media Post in Pen: भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना रायगडच्या पेणमधील एका तरूणाने सोशल मीडियावर पाकिस्तानला समर्थन करणारे पोस्ट शेअर केले आहे.

Bhagyashree Kamble

सचिन कदम, साम टीव्ही

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना रायगडच्या पेणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तरूणाला सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यत आली आहे. त्या तरूणाने सोशल मीडियावर पाकिस्तानचे समर्थन करणारे पोस्ट शेअर केले होते. ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी निषेध करत तरूणाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

मोसिन मुजावर असे तरूणाचे नाव आहे. तो रायगडच्या पेणमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे भारत पाकिस्तानमधील वाद शिगेला पोहोचलेला असताना, पेणच्या तरूणाने सोशल मीडियावर पाकिस्तानचे समर्थन दर्शवणारी पोस्ट शेअर केली. पोस्ट शेअर केल्यानंतर परिसरातील नागरिकांना संताप अनावर झाला.

नागरिकांनी तातडीने तरूणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोर्चा काढला आणि निषेध व्यक्त केला.

भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तर पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे पोस्टर पायदळी तुडवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT