Baachu Kadu On Ajit Pawar Statement  Saam TV
महाराष्ट्र

Baachu Kadu : आमचे २० मंत्रीच ४० मंत्र्यांचं काम करतात; अजित पवारांच्या 'त्या' टीकेला बच्चू कडूंचं उत्तर

'अजित दादांनी दिलेले उदाहरण फार चांगलं नाही. दुसरे उदाहरणही अजित पवारांना देता आलं असतं'

Satish Daud

अमर घटारे, साम टीव्ही

Baachu Kadu On Ajit Pawar Statement : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, मात्र शिंदे-फडणवीस सरकारला ७ महिने पूर्ण झाले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

अजित दादांनी दिलेले उदाहरण फार चांगलं नाही. दुसरे उदाहरणही अजित पवारांना  (Ajit Pawar) देता आलं असतं. विस्तार जरी झाला नाही तरी कामकाज काही कमी झाले नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मागच्या सरकारचा (महाविकास आघाडी) विस्तार झाला मात्र कामच झाले नाही, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला आहे. (Maharashtra Political News)

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले आमचे 20 मंत्री 40 मंत्र्यासारखं काम करत आहे. आमचे 20 मंत्रीच सक्षम आहे. कोणाचे काम अडले असेल तर सांगा. आता मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता नाही तर यापुढे कोणी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय काढू नये, अशी बोचरी टीकाही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांवर केली आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

"शिंदे फडवणीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही, राज्यातील महिला कर्तुत्वान नाहीत का?" असा सवाल विचारत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

"सरकारला सत्ते येऊन सात महिने झाले, मात्र अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, नऊ महिन्यात तर बाळ जन्माला येते यांना मात्र साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही" असा टोलाही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकाला लगावला होता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holidays: बँक ग्राहकांनो, लक्ष द्या! महाराष्ट्रात सलग 4 दिवस बँका; जाणून घ्या पूर्ण माहिती

Freezer Defrost Tips: फ्रीजरमध्ये साचलाय बर्फाचा डोंगर? या ३ सोप्या आणि सेफ पद्धतींनी मिनिटांत करा डीफ्रॉस्ट

Relationship Tips : मुलींना कसा जोडीदार हवा असतो? मुलांनो आजच अंगिकारा 'या' ६ सवयी

Satara Fort : दोन शिखरे, घनदाट जंगल; 'या' किल्ल्यावर पाहता येईल इतिहास अन् निसर्गाचा अद्भुत संगम

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगाव-इंदापूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT