Chicken Mutton Shop Close On Independence Day Saamtv
महाराष्ट्र

Chicken Mutton: कल्याण-डोंबिवलीनंतर आता 'या' शहरातही मांस विक्रीवर बंदी; कोण-कोणत्या महापालिकांनी घेतला निर्णय? वाचा यादी

Chicken Mutton Shop Close On Independence Day: कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरसह जळगाव महापालिकेनेही स्वातंत्र्यदिनी मास विक्री बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

  • जळगाव महापालिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त मांस विक्री बंदी आदेश जारी केला.

  • याआधी कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही बंदी जाहीर.

  • महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी आदेश काढला.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनी मांस विक्रीवर बंदी करण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलंय. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहे. कल्याण-डोंबिवली,छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या महापालिकेनंतर आता पुन्हा एका महापालिकेनं याबाबत निर्णय घेतलाय. जळगाव शहरातही मांस विक्री बंदीचे आदेश दिलेत. महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी याबाबत आदेश पत्र जारी केले आहे.

दरम्यान स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदी करण्याच्या आदेशांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय. मांस विक्री करण्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं अजित पवार म्हणालेत. दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. आता जळगाव महानगरपालिकेने स्वातंत्र्यदिनी शहरात मांस विक्री करण्यास बंदी केलीय.

याबाबतचे आदेश जळगाव महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत. मटण मार्केटसह शहराच्या विविध भागात उघड्यावर मांसविक्री केली जाते. स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवशी मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदी असलेल्या दिवशी व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई होणार असल्याचं महापालिकेनं आदेशमध्ये म्हटलंय.

कोण-कोणत्या महापालिकांनी घेतला निर्णय

इचलकरंजी शहरामध्येही १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त व २७ ऑगस्ट रोजी संवत्सरी दिवशी संपूर्ण परिसरातील चिकन, मटण दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश इचलकरंजी महानगरपालिकेचे अधीक्षक यांनी परिपत्रक काढून दिलेत.

छत्रपती संभाजीनगर शहरातही 15 आणि 20 ऑगस्ट रोजी मांस विक्रीसाठी बंदी करण्यात आलीय. 15 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आणि 20 ऑगस्ट रोजी जैन धर्मियांचे पर्युषण पर्व सुरू होत असल्यामुळे या दोन दिवशी मांस विक्री करण्याच बंदी घालण्यात आलीय.

कल्याण डोंबिवली

महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्या दिनाच्या निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातलीय. याबाबतच्या नोटीसा महापालिका क्षेत्रातील चिकन आणि मटन विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, इशारा कल्याण डोंबिवली महापालिकेने विक्रेत्यांना दिलाय. मात्र निर्णया विरोधात हिंदू खाटिक समाजाने आक्रमक पवित्र घेतलाय. तर केडीएमसीकडून या निर्णयाच्या समर्थनार्थमसाली तत्कालीन प्रशासकांनी काढलेल्या आदेशाचा हवाला दिला जातोय.

नागपूर आणि मालेगाव

आता नागपूर आणि मालेगावच्या महापालिकांनी कत्तलखाने,मांस,मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढलाय. या आदेशावर मांसाहार प्रेमींनी या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. चिकन, मटणाची दुकाने बंद ठेवली नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश महापालिकांकडून देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT