Meat Ban Row  Saam tv
महाराष्ट्र

Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

Meat Ban Row update : १५ ऑगस्टला राज्यातील विविध पालिकेच्या हद्दीत मांस विक्रीवर बंदी घालण्यात आलीये. या निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी चिकन-मटण पार्टीचा बेत आखलाय.

Vishal Gangurde

१५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी

विरोधकांकडून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी चिकन-मटण पार्टीचं आयोजन

जितेंद्र आव्हाड, इम्तियाज जलील या नेत्यांकडून चिकन-मटण पार्टीसाठी पुढाकार

मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनाही पार्टीसाठी सोशल मीडियावरून निमंत्रण

राज्यातील विविध महापालिकांनी १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवणे आणि मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या निर्णयाचा सर्वच स्तराकडून विरोध केला जात आहे. विरोधकांनीही प्रशासनाला कोंडीत पकडलंय. एकीकडे १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्रीला बंदी आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी चिकन-मटण पार्टीचा बेत आखला आहे.

स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाना, चिकन-मटण विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याच निर्णय विविध पालिाकांनी घेतलाय. यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांनी प्रशासनाच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे.

प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार गट, ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस, एमआयएम पक्षांनी टीका केली आहे. शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी चिकन आणि मटण पार्टीची घोषणा केली आहे. या पार्टीचं नेतृत्व जितेंद्र आव्हाड हे करणार आहेत. या पार्टीसाठी मनसे नेते राजू पाटील, ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, काँग्रेसचे सचिन पोटे यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालिकेच्या निर्णयाचा विरोध करत चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टीचा बेत आखला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.

तसेच महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना सोशल मीडियावरून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा खाण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. जलील यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत मुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी उपरोधक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये चुकूनही अशा टाईल्स वापरू नका; घरात कलह होण्याची वाढते शक्यता

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

Carrot Gulab Jamun : गाजराचा हलवा नेहमी खाल्ला आहे, पण कधी गाजर गुलाब जाम ट्राय केलेत? वाचा सोपी रेसिपी

Pudachi Vadi: विदर्भातली प्रसिद्ध पुडाची वडी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT