
मुंबईत कोट्यवधींचं घर तरीही मुंडे 'सातपुडा'वर
चौपाटीवर फ्लॅट, सरकारी बंगला सोडवेना
मुंडेंचे 3 अलिशान फ्लॅट असल्याचा दावा
मंत्रिपद जाऊन पाच महिने उलटले तरीही धनंजय मुंडेनी 'सातपुडा' हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही. मुंबईत आपले कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी गिरगाव मधल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे.
प्रतिज्ञापत्रात काय?
गिरगाव चौपाटीजवळ 'वीरभवन' 22 मजली इमारत
वीरभवन इमारतीच्या नवव्या मजल्यावर 902 क्रमांकाचा फ्लॅट
डिसेंबर 2023 मध्ये धनंजय मुंडे आणि पत्नी राजश्री यांच्या नावे खरेदी
फ्लॅटची किंमत 16 कोटी 50 लाख
खरेदी केल्यापासूनच घर बंदच, कुणाचंही वास्तव्य नाही..
मुंबईत कोट्यवधींच घर असूनही मुंडेंना शासकीय बंगल्याचा मोह आवरता येत नाही.
दरम्यान करुणा मुंडेंनी मुंबईत घर नसल्यास धनंजय मुंडेंनी मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये राहावं असं आवाहन करताना त्यांची आमदारकीही जाणार 9असल्याचा दावा केलाय.
दरम्यान बंगल्यावरुन वाद सुरु झाल्यावर मुंडेंनी सारवासारव केली आहे. मुंबईतील सदनिकेमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असल्याचं म्हटलंय. मात्र मंत्रिपद नसतानाही सरकारी बंगला वापरणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
सरकारला त्या कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. यासोबतच त्यांनी 48 तासांत बंगला खाली करण्याची आणि 46 लाख रुपये थकबाकी वसूल करण्याची मागणी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही सातपुडामध्ये राहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे सातपुड्यातून एक्झिट करणार का हे पाहणं महत्वाचं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.