Amravati Vinaybhang Case Saam Tv
महाराष्ट्र

Girl Molested by Teacher: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फसणारी घटना, अमरावतीत विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंग

Indecent assault by Teacher to female student: अत्यंत चीड आणणारं आणि लज्जास्पद काम शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केलं. माहिती उघड होताच शिक्षकाने स्वतःला कोंडून घेतलं. गावकऱ्यांनी शिक्षकाची कार फोडली आणि..

Saam Tv

शाळेत मुलींसोबत विनयभंग करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच अमरावतीमधून गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फसणारी घटना समोर येत आहे. विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. ही संतप्त घटना अमरावतीतल्या पथ्रोट येथील एका खासगी संस्थेच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घडली असून, अत्यंत चीड आणणारा हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ज्यामुळे पालक आणि गावकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

इंग्रजीच्या शिक्षकाने केला विनयभंग

मुख्यध्यापकांच्या माहितीनुसार, 'शाळेत इंग्रजीच्या शिक्षकाने २५ नोव्हेंबरला विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ही सगळी बाब विद्यार्थीनीने मंगळवारी मुख्यध्यापकांसमोर बोलून दाखवली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, शिक्षक आणि पालकांना शाळेत बोलवून, हा प्रकार सविस्तर जाणून घेतला. दरम्यान, पालकांना याची माहिती मिळताच, संतप्त गावकरी शाळेत दाखल झाले.

पालक आणि मुख्यध्यापकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पथ्रोट पोलिसांनी मुलीकडून माहिती जाणून घेत, पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. गावात सध्या पोलिसांनी चोख बंदोबस्त केला असून, पालकांना शांतता ठेवण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.

शिक्षकाच्या कारची तोडफोड करत रोष व्यक्त

२ दिवस हा शिक्षक सुट्टीवर होता. मात्र, शिक्षक शाळेमध्ये परतल्याचे समजताच, हजारो गावकऱ्यांनी शाळेत धाव घेतली. शिक्षकाच्या कारची तोडफोड करत उलटवली. अशा प्रकारे गावकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. शाळेच्या आवारात गावकऱ्यांनी शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, शिक्षकाने शाळेतच स्वतःला कोंडून घेतले.

पुढे चोख बंदोबस्तात त्याला खोलीबाहेर काढण्यात आले, आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यादरम्यान, पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी पालक आणि गावकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. शिंदी गावात मोठा पोलिस बंदोबस्त केल्यानंतर परिस्थिति नियंत्रित आल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, यापूर्वीही शिक्षकाने एका मुलीची अशीच छेड काढली होती. याची रीतसर तक्रार देखील नोंदवण्यात आली होती.प्राप्त माहितीनुसार, यापूर्वीही शिक्षकाने एका मुलीची अशीच छेड काढली होती. याची रीतसर तक्रार देखील नोंदवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT