Indapur Gopichand Padalkar News Saam Digital
महाराष्ट्र

Indapur Gopichand Padalkar News: इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, उपोषणस्थळी नेमकं काय घडलं?

Indapur Gopichand Padalkar News: गोपीचंद पडळकर अण्णा काटे यांच्या आमरण उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले होते. दरम्याच याच ठिकाणी मराठा समाज्याच्या वतीने साखळी उपोषण सुरु होते. पडळकर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही येथे का आला असे म्हणत मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली आहे.

Sandeep Gawade

Indapur Gopichand Padalkar News

अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली. याठीकाणी साखळी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी, गोपीचंद पडळकरांना आपण येथे का आला आहात, असे विचारत त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची माहिती आहे. तसेच मराठा आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणाही दिल्या आहेत.

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांनी दिला आहे.

पुणे जिह्यातील इंदापूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्यासह अनेक ओबीसी नेते हजर होते. या सभेत छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी गोपीचंद पडळकरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान इंदापुरमध्ये दोन समाजाचे उपोषण सुरू आहे. अण्णा काटे यांचे उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी मराठा समाजाचेही साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान आज गोपीचंद पडळकर उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी साखळी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी, गोपीचंद पडळकरांना आपण येथे का आला आहात, असे विचारत चप्पलफेक केली. त्यामुळे उपोषण ठिकाणी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मराठा समाजाने चप्पलफेक केल्याचा आरोप फेटाळला असून चप्पलफेक करणारी माणसं पडळकर यांचीच असल्याचा आरोप केला आहे. तर चप्पलफेकीच्या घटनेनंतर धनगर समाजही आक्रमक झाला असून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT