Indapur Gopichand Padalkar News Saam Tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: '...तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते', चप्पलफेक प्रकणावरून पडळकरांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

Indapur Gopichand Padalkar News: '...तर त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते', चप्पलफेक प्रकणावरून पडळकरांनी दिली संतप्त प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Indapur Gopichand Padalkar News:

शनिवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली होती. अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जात असताना इंदापूरमध्ये त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. यावरच आता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंधे आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ''आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की, गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर, कधी कुणाला फोन करून शिव्या देतात.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, '''यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. कारण ते स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे शत्रू आहेत.''

पडळकर पुढे म्हणाले, ''काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर, त्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगडात सुनील तटकरे यांचा भरत गोगावले यांना दे धक्का

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना अजून एक धक्का! ९५२६ महिलांचे अर्ज बाद; कारण काय?

Samosa Recipe : चटपटीत-खुसखुशीत समोसा बनवायचाय? परफेक्ट भाजीची रेसिपी पाहा

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

SCROLL FOR NEXT