सचिन बनसोडे, प्रतिनिधी
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेचे जागा वाटप, उमेदवारांची यादी जाहीर होत असून इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. एकीकडे विधानसभेचा रणसंग्राम सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या कारखान्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. १३७ कोटी रुपये भरण्याचे आदेश या नोटीसीमध्ये देण्यात आले आहेत. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाखांची सत्ता असलेल्या मुळा सहकारी साखर कारखान्याला नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शंकरराव गडाख हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे या कारवाईमागे राजकारण असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विरोधी आमदार असल्याने कारखाना तसेच इतर संस्थाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. यावरुन शंकरराव गराख यांनीही गंभीर आरोप केले आहेत. राजकीय सुडबुद्धीने ही नोटीस पाठवल्याचा आरोप शंकरराव गडाख यांनी केला असून या विरोधात कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये भाजप नेते अमोल बालवडकर यांच्या सासऱ्यांच्या घरी म्हणजेच महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकला होता. अमोल बालवडकर हे विधानसभा निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बंडखोरीचेही संकेत दिले होते. अशातच त्यांच्या मेहुण्यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.