Rohit Pawar Latest News in Marathi, Karjat Latest News, Jamkhed Latest News, Rohit Pawar In Nagpur
Rohit Pawar Latest News in Marathi, Karjat Latest News, Jamkhed Latest News, Rohit Pawar In Nagpur  Saam Tv
महाराष्ट्र

हाेय, हे खरं आहे! कर्जत जामखेडच्या अधिकार्‍यांवर माझा दबाव आहेच - राेहित पवार

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - आज राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे काटोल विधानसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रोहित पवार यांनी अनिल देशमुख यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते म्हणाले की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) आपले सर्वांचे नेते आहेत. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मतदारसंघात अतिशय चांगली काम झाली आहे. (Rohit Pawar Latest News in Marathi)

हे देखील पाहा -

सुजय विखे पाटलांबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेड मधील अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची काम करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच. आमदार एवढा काम करत असेल आणि लोकांच्या हितासाठी लोकात जाऊन काम करत असेल. तर को-ऑर्डिनेशनचे काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच. मुळात ते पीए नाही तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखे यांना हेच सांगायचं होतं की त्या ठिकाणी अतिशय चांगली काम सुरू आहे. आता काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत आहेतअसे देखील पवार म्हणाले.

पूढे रोहित पवार म्हणाले की, कुठल्याही धार्मिक स्थळावर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो. अयोध्यासह अजमेर, वाराणसी, पुष्कर, आणि सारनाथला ही जाऊन आलो मन प्रसन्न झालं. ही कौटुंबिक व्हिजिट होती. जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जातात तसेच मी पण कुटुंबासह गेलो होतो.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

SCROLL FOR NEXT