संजय राठोड
यवतमाळ: महागांवच्या शिवभोजन केंद्रात किसळवाणा प्रकार समोर आला आहे. येथे चक्क शौचालयात शिवभोजन थाळ्या धुतल्या जात आहेत. शिवभोजनथाळी बाबतीत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. (Shivbhojan Thali Yavatmal)
सर्व सामान्य गरीब कामगारांना १० रुपयात भोजन मिळावे म्हणून राज्य सरकारने (State Government) शिवभोजनथाळी (Shivbhojan Thali) सुरू केली. राज्यात या शिवभोजन थाळी केंद्रात बनावट लाभार्थी दाखवून शासनाचे अनुदान लाटल्या जात असल्याचा आरोप देखील झाला होता. आता यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव येथे शिवभोजन थाळी चक्क एका शौचालयाच्या ठिकाणी धूत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महागांव तालुक्यातील इजणी येथील त्रिमूर्ती महिला बचत गट करून शिवभोजन केंद्र चालवल्या जातो. शिवभोजन साठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांना शौचाल्यास वापरल्या जाणाऱ्या पाण्याने धुतल्या जात आहेत. त्यामुळे शिवभोजन केंद्रात चक्क शौचालयाच्या आत थाळ्या धुत असल्याचा किसळवाणा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.
पहा व्हिडीओ-
संपूर्ण महाराष्ट्र्रात प्रसिद्ध असलेल्या शिवभोजन थाळीच्या ठिकाणी मुबलक स्वच्छ पाणी व पुरेशी स्वच्छता असायला हवी त्या विषयी खबरदारी घेणे हे क्रमप्राप्त असताना असा प्रकार समोर आल्याने आता पुन्हा शिवभोजन थाळी वादात आली आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.