नाशिक: फक्त एक महिन्यासाठी लग्न लावून देणाऱ्या दोन एजंट्सला बेड्या
तबरेज शेख
नाशिक : एक महिन्यासाठी बोगस लग्न लावून देत फसवणूक करत एजंट म्हणून काम करणाऱ्या दोन आरोपींना येवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मुलाच्या कुटुंबाकडून तिन लाख रुपये घेऊन बीडच्या मुलीशी लग्न लावून देण्यात आले होते. या प्रकरणी येवला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
साहेबराव गीते आणि संतोष फड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. अंबेजोगाई गावाजवळ एका मंदिराबाहेरच लग्न लावून देण्यात आले होते. लग्नानंतर अवघ्या एक महिन्यातच मुलगी आपल्या आईसोबत माहेरी निघून गेली. फक्त एक महिन्यासाठीच मुलीचे लग्न करून देण्याचे ठरले होते अशी मुलीच्या आईने मुलाच्या कुटुंबाला माहिती देताच मुलाच्या घरच्यांना धक्का बसला.आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुलाच्या आईने येवला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येवला पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.