उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेSaam Tv

कोरोना काळातील गुन्हे गृहविभाग मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कोरोना काळातील लॉकडाउन काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना महाराष्ट्र राज्य सरकारने (State Government) मोठा दिलासा दिला आहे.
Published on

रश्मी पुराणिक

मुंबई: कोरोना काळातील लॉकडाउन काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना महाराष्ट्र राज्य सरकारने (State Government) मोठा दिलासा दिला आहे. गृह विभागाने या विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांवर कलम 188 अंतर्गत दाखल सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माहिती दिली की, मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल.

दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयासंबंधी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “कोविडच्या काळात संचारबंदी किंवा जे नियम होते त्यावेळी काही नागरिक किंवा विद्यार्थी यांच्यावर 188च्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तर हे सर्व गुन्हे पाठीमागे घेण्याच्या संदर्भामध्ये विभागाचा तत्वतः निर्णय झालेला आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन हा प्रस्ताव मांडू आणि हे सर्व गुन्हे पाठीमागे कसे घेता येतील याबद्दल सांगू. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाताना ज्या अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो त्या होऊ नयेत यासाठी हा आमचा प्रयत्न राहणार आहे," अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.

उद्धव ठाकरे
पुणे: पीएमपीच्या कंडक्टरकडून 17 वर्षीय तरुणीचा विनयभंग!

दरम्यान, “राजकीय किंवा बैलगाडा शर्यतीसंबंधी गुन्हे असतील तर ते मागे घेण्यासंबंधी निर्णय झाला आहे. प्रक्रियेप्रमाणे सर्व जिल्हा प्रमुखांकडून शासनाकडे निर्णय येईल. त्यानंतर सरकार निर्णय घेईल. नंतर कोर्टात जाऊन गुन्हे मागे घेतले जातील,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com