Nandurbar News
Nandurbar News दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar News: तब्बल ४७ दिवसांनंतर विवाहितेवर अंत्यसंस्कार; मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे वडिलांनी उभारला लढा

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विवाहितने गळफास लावत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते, मात्र ही आत्महत्या नसून खून आहे, तसेच पीडितेवर बलात्कार (Sexual Assault) झाल्याचा आरोपही तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह हा मीठाच्या खड्ड्यात होता. अखेर काल, शनिवारी तब्बल ४७ दिवसांनंतर पीडितेच्या पार्थिवावर आदिवासी रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. (Nandurbar News)

शुक्रवारी जे.जे. रुग्णालयातून पीडितेचे पार्थिव तिच्या गावी पोहचल्यानंतर तिला खड्यात पुरण्यात आले होते. मात्र तिचे वडील प्रवासात असल्याने शनिवारी सायंकाळी तिच्यावर आदिवासी रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसरीकडे या घटनेप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात येणार आहे. काल जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी याप्रकरणी चौकशी केली. पिडीतीच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी खटला जलतगती न्यायालयात चालवण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तर यातील दोषी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी देखील त्यांनी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एका जणाने बळजबरीने पीडितेला गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेऊन गेले होते. यानंतर पीडितेचा तिच्या नातलगाला फोन आला. या फोनवरील संभाषणात तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली. पीडितेने फोनवर सांगितले की, रणजीतसह चार जणांनी तिच्यावर चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत केले, तसेच ते (आरोपी) मला मारुन टाकतील असे पीडितेने फोनवर सांगितले.

या फोननंतर काही काळातच तिने (पीडितेने) वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतवण्यात आला होता. यावेळी पुरावे नष्ट केले गेले असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगुनदेखील मृत पावलेल्या पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडितेला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुंबियांनी केला आहे.

शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणातील संशयीत रणजीत ठाकरे याच्यासह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतांना पोलिसांच्या या भूमिकेचा पीडितेच्या वडिलांनी विरोध केला आहे. तिच्या वडिलांनी मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर मृतदेहाला अग्निडाग दिला परंतू त्यावर अंत्यसंस्कार केले नव्हते. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले होते. या सगळ्या कठीणप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील वळवी कुटुंबियांसमवेत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT