रायगडच्या न्यायालयीन इतिहासात फक्त 'या दोन व्यक्तीं'साठी रात्री झाली सुनावणी Saam Tv News
महाराष्ट्र

रायगडच्या न्यायालयीन इतिहासात फक्त 'या दोन व्यक्तीं'साठी रात्री झाली सुनावणी

रायगडच्या न्यायालयीन इतिहासात फक्त दोनवेळा रात्रीही सुनावणी झाली आहे. पहिली सुनावणी अर्णब गोस्वामी यांची अलिबागला तर दुसरी नारायण राणे यांची महाडमध्ये सुनावणी झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड : न्यायालयाचे कामकाज हे सायंकाळी पाच वाजता बंद होते. त्यानंतर शक्यतो न्यायालयातील न्यायदानाचे काम होत नाही. तसेच महत्वाचे काही असेल तर न्यायदान केले जाते. रायगड जिल्ह्यात रात्री उशिरा न्यायालय सुरू राहण्याच्या आजपर्यंत दोन घटना घडल्या आहेत. एक अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि दुसरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासाठी. ह्या दोन्ही व्यक्ती महत्वाच्या असल्याने त्यांच्यासाठी न्यायालयात उशिरा पर्यत कामकाज सुरू होते. अशीच तत्परता ही सर्व सामन्यांसाठीही न्यायालयाने दाखवावी अशी चर्चा या दोन घटनेनंतर सुरू झाली आहे. (In the judicial history of Raigad, the hearing at night only for 'these two persons')

हे देखील पहा -

अलिबाग तालुक्यातील कावीर येथील अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथून अटक करून अलिबाग येथे आणले होते. यावेळीही मोठा गदारोळ मजला होता. भाजपच्या अनेक आमदारांनी या घटनेचा निषेध केला होता. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी आणि दोघांना अलिबाग न्यायालयात हजर केले होते. या खटल्यात अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता. या खटल्यासाठीही रात्री बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू ठेवण्यात आले होते. ही घटना सप्टेंबर 2020 साली झाली होती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याच्या विरोधात महाड मध्ये 24 ऑगस्ट रोजी दाखल झाला आणि गदारोळ माजला. संगमेश्वर येथून रायगड पोलिसांनी राणे यांना अटक करून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना सायंकाळी महाड प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. खटल्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रात्री उशिरा बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू होते.

रायगडच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच न्यायदानाचे काम हे रात्री उशिरा पर्यत सुरू होते. दोन्ही व्यक्ती ह्या महत्वाच्या असल्याने ही तत्परता दाखविण्यात आली आहे. न्याय हा रात्रीही देता येऊ शकतो हे जरी खरे असले तरी तो सर्व सामन्यांसाठी नाही हेही तितकेच खरे आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माणिकराव कोकाटे विजयाच्या उंबरठ्यावर

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT