सांगलीत मातेने बस मध्येच दिला बाळाला जन्म Saam Tv News
महाराष्ट्र

सांगलीत मातेने बस मध्येच दिला बाळाला जन्म

मातेने बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना आज सांगलीच्या भोसे येथे घडली आहे. त्यानंतर आई आणि बाळाला भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : मातेने चक्क बसमध्येच  बाळाला जन्म दिल्याची घटना आज सांगलीच्या भोसे येथे घडली आहे.. तर आई आणि बाळाला भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.. दोघांची तब्यत चांगली आहे.. मात्र  बस चालक आणि प्रवाशी यांनी माणुसकीचे दर्शन घडवुन दिले. (In Sangli, the mother gave birth to the baby in the bus, both are safe)

हे देखील पहा -

जत सांगली कोल्हापुर बस आज सकाळी जत हुन कोल्हापूर कडे रवाना झाली. या बस मध्ये जत मधील गोंधळेवडी येथील कुटुंब दवाखान्यात जाण्यास चढले होते. बस कवठेमहांकाळच्या पुढे गेल्या नंतर वनिता शामराव गळवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. तेव्हा थोड्यावेळ बस मध्येच रस्त्यात थांबवली आणि वनिता यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

वनिता यांना घेऊन बसमधील प्रवासी आणि बसचे चालक वाहक यांनी पुढे असणाऱ्या भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बाळ आणि आई दोघांची तबेत चांगली आहे. तर चालक B.T. माने आणि वाहक S.S. चव्हाण यांचे जत मधील आगार व्यवस्थापक यांनी सत्कार केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT