Aurangabad Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad Truck Accident: मोठी दुर्घटना! ट्रकच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर एक जखमी

अपघातात रस्त्याने पायी चाललेली एक महिला ट्रक खाली चिरडली गेली.

साम टिव्ही ब्युरो

सुशील थोरात

Aurangabad News : औरंगाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. रस्त्यावरील पांढरी पूल शिवारात दोन ट्रकचा अपघात झालाय. अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Latest Aurangabad Accident News)

समोर आलेल्या आधिक माहितीनुसार, हॉटेल सिंहगड समोर कांद्याच्या गोण्या भरलेला ट्रकला औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातात रस्त्याने पायी चाललेली एक महिला ट्रक खाली चिरडली गेली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमधील एका व्यक्तीचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जोरात धडक बसल्याने ट्रकमधील कांद्याच्या गोण्या रस्त्यावर पडल्या. तसेच संपूर्ण कांदे रस्त्यावर पसरले आहेत. यात कांद्यांचे मोठे नुकसान झाले.

नाशिकमध्ये देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकच्या लासलगावमध्ये मालगाडीने धडक दिल्याने ४ रेल्वे कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्वे कामगारांचा मृत्यूने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लासलगाव - उगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे कर्मचारी ट्रॅक देखभाल, दुरुस्तीचे काम करत असताना मालगाडीने धडक दिली. या मालगाडीच्या धडकेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चारही रेल्वे कर्मचारी चाळीशीच्या आतील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT